मतमोजणीच्या तोंडावर नवा सर्व्हे, वंचित आणि मनसे उघडणार खातं!

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीसह सर्व इतर माध्यमांनी केलेल्या EXIT POLL च्या निकालांमध्ये भाजप - शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसतं. मात्र,

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2019 09:23 PM IST

मतमोजणीच्या तोंडावर नवा सर्व्हे, वंचित आणि मनसे उघडणार खातं!

मुंबई, 23 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. पण त्याआधी मात्र EXIT POLL पोलच्या माध्यमातून कोण बाजी मारणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. TV9मराठी या वृत्तवाहिनीने VDPA च्या सौजन्याने दिलेल्या EXIT POLL नुसार, भाजपला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि मनसे आपलं खातं खोलणार असल्याचं म्हटलं आहे.

VDPA च्या सौजन्याने दिलेला EXIT POLL

भाजप - 126-135

शिवसेना - 79-88

काँग्रेस - 16-26

Loading...

राष्ट्रवादी - 33-43

मनसे - 1

वंचित - 2-5

इतर - 5-13

News18 Lokmat  आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीसह सर्व इतर माध्यमांनी केलेल्या EXIT POLL  च्या निकालांमध्ये भाजप - शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसतं. मात्र, VDPAने दिलेल्या अंदाजानुसार, भाजपला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 6 एक्झिट पोल्सच्या निकालांमध्ये सर्वांनीच भाजप युतीला बहुमत दिलं आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो.

इतर बातम्या - परळीतून 'या' मुंडेंना सगळ्यात मोठा धक्का, पाहा काय आहे EXIT POLLचा निकाल!

महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज News18 च्या EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं हा Exit Poll चा निकाल सांगतो. युतीला सर्वांत कमी जागा इंडिया टुडे अॅक्सिसने केलल्या मतदानोत्तर चाचणीत दिल्या आहेत. India Today Axis Exit poll नुसार, भाजप-सेना महायुती - 166-194, काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 72-90 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेस आघाडीला जास्तीत जास्त 90 जागा मिळतील असा अंदाज या एकमेव एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. यापेक्षा जास्त जागा आघाडीला कुठल्यागी एक्झिट पोलने दिलेल्या नाहीत.

News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

News18 IPSOS

भाजप-सेना महायुती - 243

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 41

अन्य - 4

इतर बातम्या - काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे समोर, 'इतक्या' जागा जिंकण्याचा केला दावा

------------------------

पक्षानुसार एक्झिट पोलचा अंदाज

भाजप - 141

सेना - 102

काँग्रेस - 17

राष्ट्रवादी - 22

MIM - 01

मनसे - 01

इतर  - 02

अपक्ष - 03

------------------------

Times Now

भाजप-सेना महायुती - 230

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 48

अन्य - 10

------------------------

ABP C Voter -

भाजप-सेना महायुती - 204

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 69

अन्य - 15

------------------------

India Today Axis

भाजप-सेना महायुती - 166-194

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 72-90

अन्य - 22-34

------------------------

Republic Jan ki baat -

भाजप-सेना महायुती - 216-230

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 50-69

अन्य - 8-10

------------------------

TV9 - Cicero

भाजप-सेना महायुती - 197

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी - 75

अन्य - 16

------------------------

अन्य बातम्या -

पत्नीच्या मृत्यूनंतर समोर आलं धक्कादायक सत्य, लग्नाआधी पतीने केलं होतं...!

भारत-पाक सीमेवर गोळीबार, महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण!

विधानसभेच्या निकालापूर्वीच काढली विजयी मिरवणूक, NCPच्या 'या' उमेदवारावर गुन्हा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...