आज मतदान, फडणवीस सरकारचं भवितव्य होणार मतदानयंत्रात बंद!

आज मतदान, फडणवीस सरकारचं भवितव्य होणार मतदानयंत्रात बंद!

मतदानावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत घेऊन येण्याचं मोठं आव्हान निवडणूक आयोग आणि कार्यकर्त्यांसमोर आहे.

  • Share this:

मुंबई 21 ऑक्टोंबर : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होतय. विधानसभेच्या 288 जागांसाठी सर्व तयारी पूर्ण झालीय. आज राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारचं भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. राज्यात शांततेत मतदान पार पडावे म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर गडचिरोलीसारख्या संवेदनशील मतदान केंद्रांवर दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. मतदानकेंद्रांवर मोठी लगबग सुरु असून जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दिव्यांगांसाठी विशेष सोय करण्यात आलीय. दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलाचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुर्गम भागासाठी वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणीसाठी ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे.

'डिजिटल इंडिया'त चिखलाचे साम्राज्य असलेल्या रस्त्यावरून EVM चा बैलगाडीतून प्रवास

या शिवाय गुगल मॅपमध्ये सर्व मतदान केंद्रे टॅग केल्याने मतदान केंद्र नेमके कुठे आहे, किती जवळ किंवा लांब आहे हे मतदारांना घर बसल्या समजणार आहे. मतदानावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत घेऊन येण्याचं मोठं आव्हान निवडणूक आयोग आणि कार्यकर्त्यांसमोर आहे.

बारामतीला पावसाने झोडपलं, रस्त्यांवर वाहिले पाण्याचे पाट

1 हजार उमेदवार कोट्यधीश

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आणि प्रचार यावेळी चांगलाच गाजला. आरोप-प्रत्यारोप, हल्लाबोल आणि प्रचार सभांमुळे वातावरण ढवळून निघाले. या प्रचारात सर्वच पक्षांनी जे उमेदवार दिलेत त्या उमेदवारांची संपत्ती आणि त्यांची पार्श्वभूमी चकीच करणारी आहे. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना जे शपथपत्र दिलं त्या शपथपत्रांचा अभ्यास करून Association for Democratic Reforms (ADR) या संस्थेने काही निष्कर्ष काढले आहेत. त्यावरून सर्व उमेदवारांमधले 1 हजार उमेदवार कोट्यधीश असून तब्बल 916 उमेदवारांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपांचे खटले दाखल असल्याची माहिती पुढे आलीय.

'डिजिटल इंडिया'त चिखलाचे साम्राज्य असलेल्या रस्त्यावरून EVM चा बैलगाडीतून प्रवास

या श्रीमंत उमेदवारांमध्ये सर्वात जास्त उमेदवार हे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीही फार मागे नाहीत. एकूण 1,007 उमेदवार हे कोट्यधीश आहेत अशी माहिती ADR ने दिलीय. यासाठी विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीतल्या 3,112  उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करण्यात आलाय. त्यातले 1,007 उमेदवार हे कोट्यधीश असल्याचं आढळून आलंय. 2014 मध्ये 2,336 उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करण्यात आलाय. त्यातले 1,095 उमेदवार हे कोट्यधीश असल्याचं आढळून आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 06:46 AM IST

ताज्या बातम्या