'वंचित'ची दुसरी यादी जाहीर, गिरीश महाजन, अशोक चव्हाणांविरोधात दिले 'हे' उमेदवार

'वंचित'ची दुसरी यादी जाहीर, गिरीश महाजन, अशोक चव्हाणांविरोधात दिले 'हे' उमेदवार

अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीने सोमवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई,30 सप्टेंबर: अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीने सोमवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 122 जणांची नावे आहेत. याआधी वंचितने 22 जणांची पहिली यादी दिली होती. त्यामुळे वंचितने आतापर्यंत 142 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. लवकरच वंचितकडून उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

गिरीश महाजनांच्या विरोधात दिला हा उमेदवार...

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात वंचितने जामनेरमधून सुमीत चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तसेस कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधातही वंचितने उमेदवार जाहीर केला आहे. भोकर मतदारसंघामधून वंचितने नामेदव आईलवार यांना रिंगणात उतरवले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यत लक्ष लागले आहे. बहुतांश पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी गेली लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र, जागावाटपाच्या मुद्द्यावरुन एमआयएम आणि वंचित आघाडीने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काडीमोड केली. यानंतर वंचितने स्वतःच सर्व जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. महत्त्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीने यादी जाहीर करताना उमेदवारांच्या जातीचाही उल्लेख केला आहे.

आंबेडकरांच्या 'या' निर्णयामुळे आघाडीची चिंता वाढणार

'वंचित' महाराष्ट्रातल्या सर्व 288 जागा लढविणार असल्याचा प्रकाश आंबेडकर यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली. आंबेडकरांच्या या घोषणेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभेत MIM वंचित सोबत होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत MIM ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याने मुस्लिम आणि बहुजन मतांची मोठ्या प्रमाणावर विभागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडी 288 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत सगळ्याच म्हणजे 288 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. अर्धा CPM, महाराष्ट्र विकास आघाडी, असे लोक आमच्यासोबत आहेत. निवडणुकीसाठी गोपीचंद पडळकर ते भाजपमध्ये गेले आहेत. आणि निवडणुकीनातर ते आमच्याकडे परत येतील असंही आंबेडकर यांनी सांगितले. त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा आहेत असंही त्यांनी सांगितले.

लोकसभेच्या निवडणुकीत वंचित मुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला होता. आघाडीला 10 ते 12 जागांचा फटका बसल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे विधानसभेत काय निकाल लागतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. वंचितचा जो मतदार आहे तो काँग्रेस-राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे त्यात खिंडार पडण्याची शक्यता आहे. आमचा मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी हा भाजप-शिवसेना असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. तर वचिंत हाच आमचा मुख्य विरोधक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे राजकीय सामना चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.

VIDEO:...म्हणून वंचित आघाडीतून पडलो बाहेर, पडळकरांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 08:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading