पंतप्रधान मोदींसमोरच उद्धव ठाकरेंनी 'युती'वर केलं शिक्कामोर्तब

पंतप्रधान मोदींसमोरच उद्धव ठाकरेंनी 'युती'वर केलं शिक्कामोर्तब

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 7 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. 'महाराष्ट्रात युतीचंच सरकार येणार, राज्याचा विकास करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे', असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नवीन मेट्रोचे मार्ग आणि मेट्रो भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. यावेळेस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

(वाचा : इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं स्पिरिट मुंबईकरांसारखं - पंतप्रधान मोदी)

'मोदीजी किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करू. गेली अनेक वर्ष ज्या गोष्टी आपण बोलत होतो त्या गोष्टी करून दाखवल्या आहेत', या वाक्यानंच उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.दरम्यान, यावेळेस उद्धव ठाकरेंनी आता समान नागरी कायदा आणि राम मंदिरही उभारण्याचं स्वप्नही पूर्ण करू असा निर्धार देखील व्यक्त केला.

(पाहा : मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडून टाळ्या वाजवून घेतल्या, युतीवरून फटकेबाजी)

विकासकामांचं भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (7 सप्टेंबर) वांद्रे-कुर्ला  संकुलात तीन मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचं भूमिपूजन करण्यात आलं. या तीन मार्गांमुळे शहरातील मेट्रोचं जाळं 42 किलोमीटरनं वाढणार आहे. यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक हा मेट्रो 10 वरील 9.2 किलोमीटर मार्ग, मेट्रो 11 वरील वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मेट्रो 12 वरील कल्याण ते तळोजापर्यंत 20.7 किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे. तसंच कांदिवलीतील बाणडोंगरी मेट्रो स्थानक आणि मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मेट्रो कोचचंही उद्घाटन त्यांनी केलं.

(पाहा : VIDEO : असा आहे 'मेक इन इंडिया'अंतर्गत बनवलेला मेट्रोचा पहिला कोच)

पंतप्रधान मोदींकडून उद्धव ठाकरेंचा लहान भाऊ असा उल्लेख, पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: September 7, 2019, 1:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading