या 'रणरागिणी' विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, आजमवत आहे नशीब!

या 'रणरागिणी' विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, आजमवत आहे नशीब!

बंडखोरांना मोठा फटका बसण्याची शक्यता...

  • Share this:

मोहन जाधव,(प्रतिनिधी)

रायगड, 15 ऑक्टोबर: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात श्रीवर्धन, अलिबाग, पेण याठिकाणी राष्ट्रीय पक्षांनी महिला उमेदवारांना संधी दिली आहे. उमेदवारी दिलेल्या तीनही महिला उमेदवारासमोर मोठे आव्हान असले तरी बंडखोरांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडातील अदिती तटकरे, अॅड. श्रद्धा ठाकूर, नंदा म्हात्रे या तीनही रणरागिणी या परिस्थितीचा कसा 'सामना' करतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

काँग्रेस पक्षाने अलिबाग व पेण मतदारसंघात महिला उमेदवार दिले आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघात अॅड. श्रद्धा ठाकूर यांना काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी दिली आहे. शेकाप, शिवसेना उमेदवारांचे आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

पेण मध्ये काँग्रेसने नंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र पाटील हे भाजपात गेल्याने काँग्रेसची ताकद काही प्रमाणात कमी झाली आहे. तर दुसरीकडे शेकापचे वर्चस्व पेण मतदारसंघात आहे. त्यामुळे नंदा म्हात्रे या राजकीय परिस्थितीत विरोधकांचे आव्हान कसे पेलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना संधी दिली आहे. या मतदारसंघात पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाने महिलेला संधी दिली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या अदिती तटकरे या कन्या असून या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अदिती तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे कडवे आव्हान असताना आघडीतील काँग्रेस पक्षातील तीन जणांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे एकीकडे बलाढ्य शिवसेना, मित्रपक्षातील बंडखोरी याचे आव्हान अदिती तटकरे या कशा पद्धतीने पेलणार हे निकालानंतर कळणार आहे.

श्रीवर्धन, अलिबाग, पेण येथील मतदार महिलेला विधानसभेत नेतृत्व करण्याची संधी देणार का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

कोण कुणाची बायको? ओवेसींचा काँग्रेसवर घणाघात, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 07:03 PM IST

ताज्या बातम्या