'स्वाभिमानी'ला धक्का.. रविकांत तुपकरांनी सोडली राजू शेट्टींची साथ

'स्वाभिमानी'ला धक्का.. रविकांत तुपकरांनी सोडली राजू शेट्टींची साथ

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई,26 सप्टेंबर:विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रविकांत तुपकर हे पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक मानले जात होते.

राजू शेट्टींकडे सोपवला राजीनामा रवीकांत तुपकर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा राजू शेट्टी यांना पाठवला आहे. 'मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजूर करावा' असे म्हटले आहे. दरम्यान, रवीकांत तुपकर यांचा राजीनामा अद्याप मला प्राप्त झालेला नाही. तो माझ्याकडे आल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईल, असे स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

भाजपच्या वाटेवर...

रविकांत तुपकर भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. तुपकरांनी याआधी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ते लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

वंचित मधून बाहेर पडणार हा नेता..

Loading...

वंचित बहुजन आघाडीतून एमाआयएम बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना एक मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस गोपिचंद पडळकर यांनी राजीनामा दिला आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. ते भाजपच्या तिकिटावर जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

चक्क विहीरच गेली वाहून, बारामतीतला VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 09:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...