उदयनराजेंपेक्षाही अबू आझमी श्रीमंत, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकीत!

उदयनराजेंपेक्षाही अबू आझमी श्रीमंत, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकीत!

साताऱ्यातून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उभे असलेले भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा अबू आझमी यांची संपत्ती जास्त असल्याची माहिती पुढे आलीय.

  • Share this:

मुंबई 03 ऑक्टोंबर : राज्यातल्या विधानसभा निवडणुकींसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता फक्त 1 दिवस राहिलाय. 4 ऑक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झालीय. अर्ज भरण्यासोबतच उमेदवारांना प्रतिज्ञापत्रही द्यावं लागतं. त्यात प्रत्येक उमेदवारांना आपलं उत्पन्न, स्थावर-जंगम मालमत्ता, असलेले गुन्हे याचा सर्व तपशील द्यावा लागतो. त्यामुळे अनेक गोष्टी मतदारांपुढे येत असून श्रीमंत उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू झालीय. या सगळ्यात नंबर मारला तो भाजपचे मुंबईतले उमेदवार मंगलप्रभात लोढा यांनी त्यांची संपत्ती तब्बल 500 कोटींची आहे. तर साताऱ्यातून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उभे असलेले भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यापेक्षा अबू आझमी यांची संपत्ती जास्त असल्याची माहिती पुढे आलीय.

शिवसेनेच्या युवराजांना आघाडीचा 'हा' नेता देणार टक्कर

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली असून अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. यामुळे सर्वच पक्षाचे उमेदवार सध्या अर्ज दाखल करण्याच्या गडबडीत आहेत. अर्जासोबत दाखल करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रामुळे सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून उभ्या असलेल्या उमेदवाराची नेमकी माहिती मिळवता येते. तसंच त्या उमेदवारावर दाखल असलेले गुन्हे, किती संपत्ती आहे हेदेखील यानिमित्ताने कळते.

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हादरा, संजय निरुपम यांचा पक्ष सोडण्याचा इशारा

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचा राजानामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय. ते साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत. तर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी हे मुंबईतल्या मानखुर्द शिवाजीनगरमधून विधानसभेसाठी उभे आहेत. आझमी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 209 कोटी 8 लाखांची संपत्ती असल्याचं जाहीर केलंय. तर उदयनराजे भोसले यांच्याकडे 152 कोटी 22 लाखांची संपत्ती आहे असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलं आहे.

VIDEO पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री TVवर अँकरशी भांड भांड भांडले!

मंगलप्रभात लोढा हे मुंबईतल्या श्रीमंत पाली हिलमधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. लोढा हे मुंबईतले नामांकीत बिल्डरही आहेत. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 500 कोटींची संपत्ती असल्याचं सांगितलंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 3, 2019, 7:27 PM IST

ताज्या बातम्या