युतीच्या अधिकृत घोषणेपूर्वीच शिवसेनेने वाटले AB फॉर्म, ही आहे उमेदवारांची यादी

युतीच्या अधिकृत घोषणेपूर्वीच शिवसेनेने वाटले AB फॉर्म, ही आहे उमेदवारांची यादी

'शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यास सुरुवात केली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 सप्टेंबर: 'शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील मतदारसंघातील उमेदवारांना आज घटस्थापनेच्या मुहुर्तावर AB फार्म वाटले. मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील उमेदवारांना AB फॉर्म वाटण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघातील जे उमेदवार मुंबईत उपस्थित आहेत. त्यांना देखील AB फॉर्म देण्यात आलेत. सध्या युतीत ज्या मतदारसंघाचा जागावाटपाचा प्रश्न सुटलेला आहे. अशाच मतदारसंघातील उमेदवारांना शिवसेना AB फॉर्म देत असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे.

उमेदवारांची यादी..

आमदार गौतम चाबुकस्वार- पिंपरी

भास्कर जाधव- गुहागर

संग्राम दादा कुपेकर- चंदगड

सुजित मिणचेकर-हातकणंगले

योगेश रामदास कदम- दापोली

यामिनी यशवंत जाधव-भायखळा

संजय शिरसाट- औरंगाबाद

संतोष बांगर -हिंगोली

राजेश क्षीरसागर- कोल्हापूर

दीपक केसकर- सावंतवाडी

संजय बाबा घाडगे-कागल

चंद्रदीप नरके- करवीर

डॉ. सुजित मिणचेकर-हातकणंगले

सत्यजीत पाटील- शाहूवाडी

प्रकाश आबिटकर- राधानगरी

उल्हास पाटील-शिरुर

गुलाबराव पाटील-जळगाव (ग्रामीण)

किशोर पाटील-पाचोरा

लता चंद्रकांत सोनवणे-चोपडा

दादाजी भुसे-नाशिक

नितीन देशमुख-बाळापूर

अर्जुनराव खोतकर- जालना

विश्वनाथ सानप- रिसोड

राजन साळवी- राजापूर

उदय सामंत- रत्नागिरी

सदानंद चव्हाण-चिपळूण

वैभव नाईक- कुडाळ

युतीचा लवकरच 'घट' बसणार..

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेनेत युती होणारी की नाही याविषयी चर्चांना उधाण आले होते. मात्र, अखेर दोन्ही पक्षांकडून युती होणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या युतीचा लवकरच 'घट' बसणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुखमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी युती होणार असून जागावाटपावर चर्चा होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रविवारी दिल्लीत भाजपच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळाली आहे. जागावाटपाविषयी अधिकृत माहिती मात्र अद्याप हाती आली नाही.

युतीचा अंतिम फॉर्म्युला!

भाजप- 144

शिवसेना- 126

मित्रपक्ष- 18

भाजपच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होतेय.. या बैठकीला संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरुवात झालीये.. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील उपस्थित आहेत.. आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय होणार आहे.

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

First Published: Sep 29, 2019 06:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading