मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय आणि नपुंसकतेवर आधी बोलावं, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय आणि नपुंसकतेवर आधी बोलावं, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

सरकार निक्रिय ठरले असेल तर त्याचा निर्णय जनताजनार्दन घेईल - उद्धव ठाकरे

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 'ज्या मुद्यांना मुख्यमंत्री फडणवीस वगैरे मंडळी प्रचारात हात लावीत नाहीत त्या मुद्दय़ांना उचलू नये अशी बंधने कोणी विरोधी पक्षांवर घातलेली नाहीत, पण काँग्रेस पक्षाचा सेनापतीच युद्धभूमीवरून पळ काढतो व बँकॉकला जाऊन बसतो. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता रणात आणि मनात अशा दोन्ही ठिकाणी पराभूत होताना दिसत आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार निक्रिय आहे असे गांधी म्हणतात. मग आपण स्वतः किती क्रियाशील आहात याचाही हिशेब द्या. मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावे. सरकार निक्रिय ठरले असेल तर त्याचा निर्णय जनताजनार्दन घेईल', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- राहुल गांधींचे आता असे म्हणणे आहे की, हे सरकार निक्रिय आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. जनता कर भरते मग तो कर कुठे जातो? याचे उत्तर सरकार देत नाही असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे. सरकार निक्रिय आणि कुचकामी असेल तर विधानसभा निवडणुकीत जनता त्यांचा समाचार घेईल. प्रश्न इतकाच आहे की, संपूर्ण काँग्रेस पक्ष मेलेल्या अजगरासारखा निपचित आणि निक्रिय पडून असताना राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारला निक्रिय

ठरवले त्याचे आश्चर्य वाटते.

(वाचा : PMC Bank Scam : मुंबईतल्या खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, बँकेत अडकलेत तब्बल 90 लाख रुपये)

- लोकसभा निवडणूक निकालाच्या धक्क्यातून राहुल गांधी सावरले नाहीत व त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेस हा बिन मुंडक्याचा पक्ष म्हणून वावरत आहे.

- काँग्रेसला गेल्या चार महिन्यांत अध्यक्ष निवडता आला नाही याचे कारण आधी सांगा. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस महाराष्ट्रात इतका निक्रिय ठरला की, विरोधी पक्ष नेताच फौजफाटय़ासह भाजपात विलीन झाला. वरचे नेतृत्व निक्रिय असल्याचा हा परिणाम आहे.

(वाचा : 'भारतीय अर्थव्यवस्थेची खराब कामगिरी', नोबेल विजेते बॅनर्जींची मोदी सरकारवर टीका)

- बेरोजगारी, पीएमसी बँक घोटाळा यावर मुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा काहीच बोलत नाहीत असा आरोप राहुल गांधी करतात. भाजप व इतर नेते महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून

जनतेचे लक्ष हटविण्यासाठी इतर मुद्दे पुढे करून दिशाभूल करतात असे गांधी म्हणत असतील तर ते विरोधी पक्षांच्या निक्रियतेचे पाप आहे.

- महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कोणते? मुळात या सर्व मुद्दय़ांशी सध्या राहुल गांधींचा संबंध राहिला आहे काय? म्हणजे विरोधी पक्षांच्या बोंबलण्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. एक वेळ राज्यकर्त्यांवरचा विश्वास उडाला तर चालेल, पण लोकशाहीत विरोधी पक्षावरचा विश्वास उडता कामा नये ही भावना आहे.

(वाचा : VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा)

पुण्यात चाललंय तरी काय? जनतेच्या प्रश्नांपेक्षा मिशीवरुन राजकारण तापलं

Published by: Manoj Khandekar
First published: October 15, 2019, 10:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading