आश्वासनांची खैरात... शिवसेनेच्या 'वचननाम्या'वर आदित्य ठाकरेंच्या प्रभाव

आश्वासनांची खैरात... शिवसेनेच्या 'वचननाम्या'वर आदित्य ठाकरेंच्या प्रभाव

'शिवसेना जे बोलते ते करते', आता आदित्य बोलेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

  • Share this:

मुंबई,12 ऑक्टोबर: शिवसेनेच्या वतीने शनिवारी वचननाम्याची (जाहीरनामा) लोकार्पण मातोश्रीवर करण्यात आले. भगव्या कापडात गुंडाळून असलेला वचननामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अनिल देसाई या नेत्यांनी जनतेच्या आशीर्वादासाठी ठेवला.

नेमके काय आहे शिवसेनेच्या वचननाम्यात...

शिवसेना वचनानामा शेतमजूर, ऊसतोड कामगार कंत्राटी कामगारांना निवृत्ती वेतन, मासेमारी बंद उसळलेल्या काळात कोळी बांधवाना अनुदान. कोकण विकास प्राधिकरण स्थापन करणार, उद्योग, शेती पर्यटन विकास, कोकण निवड मंडळ पुन्हा सुरू करणार, 2019 पर्यंतची बांधकामे नियमित करणार, 50 वर्षे जुन्या सर्व म्हाढा इमारतीचे पुनर्विकास, बीडीडी चाळ पुनर्विकास, नफ्यासाठी कोचिंग शाळा उघडणाऱ्यांवर कारवाई, डिजिटल शाळा, व्हर्च्युअल क्लास रूम, सरकारी शाळांतून उत्तीर्ण झालेल्याने शासकीय नोकरीत प्राधान्य, प्रत्येक जिल्ह्यात सुपर सोसिलिटी हॉस्पिटल, नदी स्वच्छता अभियान, नवे खाते, सर्व शहर डम्पिंगमुक्त करणार, सर्वांच्या मागण्यांचा आणि सर्व बाबींचा विचार करून हा वचननामा तयार करण्यात आला आहे. हा वचननामा तयार करताना महिला वर्गांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बारकोडही देण्यात आला आहे, असे मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सोबतच सुरुवातीला या सर्व वचननाम्यात वचने विचार करून देण्यात आली आहे.

'शिवसेना जे बोलते ते करते', आता आदित्य बोलेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वचननाम्याच्या प्रत्येक पानावरील योजनेच्या माध्यमातून मराठी व्यक्तीला दिलासा मिळेल, असा प्रयत्न ठाकरे कुटुंबातून पहिल्यादा निवडणूक लढणारे आदित्यने स्पष्ट केले. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे. 10 रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात आम्ही बचतगटांची मदत घेणार आहोत. तिजोरीवर कितीवर भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण 10 रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातले एकही मत खोटं ठरणारं नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

VIDEO : झुणका भाकर केंद्राच्या जमिनीचं काय झालं? आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Published by: Sandip Parolekar
First published: October 12, 2019, 7:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading