Elec-widget

फडणवीसांचा निरोप घेऊन राणे लागले कामाला, सेनेबद्दल व्यक्त 'हे' केलं भाकित!

फडणवीसांचा निरोप घेऊन राणे लागले कामाला, सेनेबद्दल व्यक्त 'हे' केलं भाकित!

"शिवसेना जे काही करत आहे नैतिकतेला धरून नाही. निवडणुकीपूर्वी युती झाली होती. आता हे नैतिकतेला धरून नाही"

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तर दुसरीकडे सेना आणि आघाडीमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. आता भाजपकडून सेनेला उत्तर देण्यासाठी नारायण राणे मैदानात उतरले आहे.

नारायण राणे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'शिवसेना जे काही करत आहे नैतिकतेला धरून नाही. निवडणुकीपूर्वी युती झाली होती. आता हे नैतिकतेला धरून नाही. युती केली होती हेही वचन होतं. काँग्रेस -राष्ट्रवादीचे नेते तोंडावर एक बोलता आणि मागे एक बोलतात. सेनेला ते उल्लू बनवत आहे', अशी टीका राणेंनी केली. तसंच शिवसेना ही काँग्रेससोबत जाणार नाही, असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.

भाजप सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी जे जे काही करत येईल ते ते करणार, असं राणेंनी स्पष्टपणे सांगितलं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली ही दुर्दैवी बाब आहे. 'फडणवीस यांनी सरकार स्थापन करण्याच्या कामाला लागा असं मला सांगितलं आहे. आम्ही जेव्हा राज्यपालांकडे जावू तेव्हा खाली हाताने जाणार नाही, आमच्याकडे 145 जागांचं बहुमत असेल', असा दावाही राणेंनी केला.

Loading...

सेना आणि आघाडीला हवा चर्चेला वेळ!

दरम्यान, शिवसेना आणि आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत ठोस असा कोणताही निर्णय झाला नाही. परंतु, उद्धव ठाकरे आणि आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येण्याबद्दल संकेत दिले आहे. मात्र, काही मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ लागेल, असं स्पष्ट केलं आहे.

==========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 09:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...