बदलापुरात शिवसेनाविरूद्ध शिवसेना... या नगरसेवकाच्या कार्यालयाची केली तोडफोड

बदलापुरात शिवसेनाविरूद्ध शिवसेना... या नगरसेवकाच्या कार्यालयाची केली तोडफोड

राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच बदलापूर येथे शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्याच नगरसेवकाचे कार्यालय फोडले आहे. आज, बुधवारी ही घटना घडली आहे. शिवसेना नगरसेवक शैलेश वडनेरे विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने नाराज शिवसेना नगरसेवकांनी ही तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे. बदलापुरात शिवसेनाविरूद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळत आहे.

  • Share this:

गणेश गायकवाड, (प्रतिनिधी)

बदलापूर, 11 सप्टेंबर: राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच बदलापूर येथे शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्याच नगरसेवकाचे कार्यालय फोडले आहे. आज, बुधवारी ही घटना घडली आहे. शिवसेना नगरसेवक शैलेश वडनेरे विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने नाराज शिवसेना नगरसेवकांनी ही तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे. बदलापुरात शिवसेनाविरूद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळत आहे.

शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यातील वाद आता पक्षाच्या चिंतेची बाब ठरला आहे.

दरम्यान, पालिकेच्या सर्वसाधारण सभेआधी वामन म्हात्रे आणि शैले वडनेरे यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पडसाद सभा संपल्यानंतर उमटले.

वामन म्हात्रे यांच्या काही समर्थकांनी वडनेरे यांच्या कार्यालयावर जाऊन तोडफोड केली.

या प्रकरणी शैलेश वडनेरे यांनी शिवसैनिकांच्या विरोधात बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेवरून बदलापुरात शिवसेनाविरूद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 03:07 PM IST

ताज्या बातम्या