शिवसेनेची 126 जागांची मागणी भाजपने फेटाळली, एवढ्यावरच मानावे लागणार समाधान

शिवसेनेची 126 जागांची मागणी भाजपने फेटाळली, एवढ्यावरच मानावे लागणार समाधान

विधानसभा निवडणुकीत युतीत करण्यासाठी शिवसेनेने केलेली 126 जागांची मागणी भाजपने फेटाळली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,29 सप्टेंबर: भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक संपली आहे. विधानसभा निवडणुकीत युतीत करण्यासाठी शिवसेनेने केलेली 126 जागांची मागणी भाजपने फेटाळली आहे. शिवसेनेला 124 जागा देण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपने 126 जागांची मागणी फेटाळल्यानंतर आता शिवसेना काय भूमिका घेते, याकडे संगळ्यांचे लक्ष लागले आहेत.

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात निर्विवादपणे जिंकण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. तसेच ज्या ठिकाणी दोन उमेदवार स्पर्धेत आहेत, अशा जागांची वेगवेगळी यादी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. भाजपच्या परंपरागत 117 जागांवर प्रथम चर्चा करण्यात असल्याची माहिती समोर आली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेनेपाठोपाठ आता भाजपनेही संघटन मंत्र्यांना AB फॉर्मचे वाटप केले आहे. राज्यातील 6 विभागात 6 संघटन मंत्र्यांना AB फॉर्म घेऊन जाण्याचा पक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहे. यादी जाहीर होताच उमेदवारांना तासाभरात फॉर्म मिळावेत, यासाठी भाजपची व्यवस्था करण्यात आली आहे.

असे आहेत भाजपचे संघटन मंत्री..

मुंबई - सुनील कर्जतकर

कोकण- ठाणे - सतीश धोंडे

उत्तर महाराष्ट्र - किशोर काळकर

मराठवाडा - भाऊराव देशमुख

विदर्भ - उपेंद्र कोठेकर

पश्चिम महाराष्ट्र - रवींद्र अनासपुरे

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

Published by: Sandip Parolekar
First published: September 29, 2019, 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading