संजय राऊत यांनी भाजपवर साधला निशाणा.. 'हे' व्यंग्यचित्र केले Tweet

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा झाली असली तरीही शिवसेना आणि भाजपच्या युतीचे मात्र भिजत घोंगडे आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 07:33 PM IST

संजय राऊत यांनी भाजपवर साधला निशाणा.. 'हे' व्यंग्यचित्र केले Tweet

मुंबई,28 सप्टेंबर: विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा झाली असली तरीही शिवसेना आणि भाजपच्या युतीचे मात्र भिजत घोंगडे आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून खलबते सुरू असताना मात्र दोन्हीकडच्या नेत्यांकडून युती तुटण्याची वक्तव्ये, संकेत देण्यात येत आहेत. त्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांनी ज्योतिषाचे व्यंग्यचित्र ट्वीट केले आहे. 'तुम्हाला शनीपिडेपेक्षा डेंज 'ईडी'पिडा सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यावर उपाय म्हणजे कमळाचे फूल जवळ ठेवा..' असे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट..

राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं. मी स्वत:च ईडी कार्यालयात हजर होतो, असं म्हणत शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शरद पवार यांना शिवसेनेसह अनेक पक्षांनी पाठिंबा दिला होता.

दरम्यान, एकीकडे ईडी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली. नंतर ते अज्ञातवासात गेले होते. मात्र आता अजित पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. इथं शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार, भाऊ श्रीनिवास पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. कुटुंबातील सदस्यांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार माध्यमांसमोर आले.

Loading...

अजित पवारांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...