आरपीआय कार्यकर्त्याने EVM वर फेकली शाई, दिल्या 'या' घोषणा

लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी ईव्हीएमला विरोध करावा...

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 05:17 PM IST

आरपीआय कार्यकर्त्याने EVM वर फेकली शाई, दिल्या 'या' घोषणा

ठाणे,21 ऑक्टोबरः राज्यभरात सोमवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. मतदान करण्यासाठी अवघा एक तास उरला असताना ठाण्यातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमवर (EVM) शाई फेकण्याची घटना घडली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यकर्ता मतदानासाठी मतदान केंद्रावर आले असता त्याने निवडणूक कर्मचाऱ्यांजवळील शाईची बाटली हिसकावली आणि ईव्हीएमवर शाई फेकली. यावेळी मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. सुनील खांबे असे या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. खांबे यांनी शाई फेकल्यानंतर 'ईव्हीएम मुर्दाबाद'च्या घोषणाही दिल्या.पोलिसांनी सुनील खांबे यांना ताब्यात घेतले.

मिळालेली माहिती अशी की, सुनील खांबे इतर मतदारांप्रमाणेच मतदानासाठी आले. मात्र, त्यांनी अचानक निवडणूक कर्मचाऱ्यांकडून शाईची बाटली हिसकावून ती ईव्हीएम कक्षावर फेकली. त्यामुळे काहीवेळ मतदान कर्मचारी देखील गोंधळले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत खांबे यांना मतदान केंद्राबाहेर काढत ताब्यात घेतले. यावेळी खांबे यांनी 'ईव्हीएम मुर्दाबाद'च्या घोषणाही दिल्या.

EVM मुळे लोकशाही धोक्यात...

'मला फासावर लटकवले तरी चालेल, पण मी ईव्हीएमचा विरोध करत राहणार, असे सुनील खांबे यांनी यावेळी सांगितले आहे. ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या मदतीने विरोधी पक्षातील मित्रपक्षांना संपवले आहे. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी ईव्हीएमला विरोध करावा, असेही आवाहन देखील सुनील खांबे यांनी केले आहे.

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...