रोहित पवारांचा 'टि्वटर' वार.. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावरुन मोदींना लगावला टोला

रोहित पवारांचा 'टि्वटर' वार.. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावरुन मोदींना लगावला टोला

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'टि्वटर' वार केला आहे.

  • Share this:

मुंबई,15 सप्टेंबर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'टि्वटर' वार केला आहे. निमित्त आहे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचे...

'#छत्रपती या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही तर ती उपाधी मला महत्वाची वाटते. अशा वेळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम @narendramodiच्या उपस्थितीत होणार होता, पण तो कार्यक्रम एका नेत्यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये केला जातो.', असे रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. स्वदेश आणि स्वधर्मासाठी अतिशय प्रतिकूल काळात वैचारिक आंदोलन आणि संघर्ष करणारे शिवछत्रपतींचे वंशज उदयनराजे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीकडून टीका होत आहे.

रोहित पवारांची ही 'फेसबूक पोस्ट' होतेय व्हायरल...

रोहित पवार यांनी फेसबूक पोस्ट लिहूत उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'छत्रपती' या उपाधीचा मान राखला गेला पाहिजे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

'छत्रपती या उपाधीवर संपूर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही, तर ती उपाधी मला महत्वाची वाटते. अशावेळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात येतं, पण तो कार्यक्रम एका नेत्यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एकच सांगायच आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे. कोणतंही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो, तसाच आपणही तो मान ठेवावा', अशी पोस्ट रोहित पवार यांनी लिहिली आहे. उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार होते, मात्र ते उपस्थित राहू शकले नाही. अशा रीतीने नरेंद्र मोदी यांनी छत्रपती या उपाधीचा मान राखला नाही, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी शनिवारी नवी दिल्लीत भाजप प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, यांच्यासह राज्यातल्या तसेत केंद्रातील अनेक दिग्गजांची हजेरी होती.

VIDEO: भिवंडीतील गोदामात अग्नितांडव; गोदामातील कपड्याची राख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 11:51 AM IST

ताज्या बातम्या