कल्याणमध्ये प्रस्थापितांच्या डोकेदुखी वाढणार, या 'दबंग' अधिकाऱ्याचा मनसेत प्रवेश

कल्याणमध्ये प्रस्थापितांच्या डोकेदुखी वाढणार, या 'दबंग' अधिकाऱ्याचा मनसेत प्रवेश

निवृत्त माजी सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश लोहाळकर यांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

  • Share this:

प्रदीप भणगे,(प्रतिनिधी)

कल्याण, 28 सप्टेंबर: निवृत्त माजी सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश लोहाळकर यांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. कल्याण पूर्वेमधून ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे प्रस्थापितांची डोकेदुखी वाढणार आहे. मनसेचे सरचिटणीस माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या उपस्थित जगदीश लोहाळकर यांनी मनसेत प्रवेश केला. लोहाणकर हे कल्याण पूर्वेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात 'दबंग' अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध होते. एसीपी पदावरून लोहाळकर हे सेवानिवृत्त झाले होते. कल्याण पूर्व विधानस मतदारसंघासाठी ते इच्छुक असल्याने प्रस्थापितांची डोकेदुखी वाढणार आहे.

दुसरीकडे, कल्याण पश्चिम मतदारसंघ राखण्यासाठी उमेदवार बदलून द्या, अशी मागणी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी केली आहे.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेत ही मागणी करण्यात आली आहे. तर कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेसाठी घ्यावा, अशी मागणीही जोर धरत आहे. या मागणीच्या संदर्भात शिवसेनेच्या इच्छुकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

सर्वात जास्त इच्छुक उमेदवार कल्याण पश्चिम मतदार संघात आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत मातब्बर उमेदवार असून कल्याण पश्चिममधील भाजप आमदार नरेंद्र पवार यांच्यासमोरील आव्हाने आणखीच वाढताना दिसत आहे. 'हा मतदारसंघ राखण्यासाठी आम्हाला उमेदवार बदलून पाहिजे' असे साकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घालण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेतील इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेत हे साकडं घातलं तर दुसरीकडे शिवसेनेच्या सर्व इच्छुकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेसाठी घ्यावा, अशी मागणी केली. गेल्या 5 वर्षांत आपण केंद्र असो की राज्य सरकारच्या योजना की पक्ष संघटनेचे काम हे सर्व अत्यंत प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची यावर मी भाष्य करणे योग्य नसून पक्षश्रेष्ठी निश्चितच योग्य तो निर्णय घेतील असे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले आहे.

VIDEO:अजित पवारांच्या आरोपांना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 09:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading