तुमचा राग मतपेटीतून व्यक्त करा.. राज ठाकरेंचे भिवंडीकरांना आवाहन

तुमचा राग मतपेटीतून व्यक्त करा.. राज ठाकरेंचे भिवंडीकरांना आवाहन

सध्या सगळेच सत्तेसाठी धावत आहेत. पण प्रबळ विरोधक नसेल तर सत्ताधारी बेफाम होतात आणि वाट्टेल ते निर्णय घेतात.

  • Share this:

भिवंडी,12 ऑक्टोबर:विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी भिवंडीत जाहीर सभा घेतली. सध्या सगळेच सत्तेसाठी धावत आहेत. पण प्रबळ विरोधक नसेल तर सत्ताधारी बेफाम होतात आणि वाट्टेल ते निर्णय घेतात. त्यामुळे राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. बॅंका बुडताहेत, महाराष्ट्रातील उद्योगधंदे बंद पडत आहेत. तरी देखील समाजाला राग येत नाही, थंड लोकांचे नेतृत्त्व करायला मला आवडत नाही, असे सांगत तुमचा राग मतपेटीतून व्यक्त करा आणि मनसेला विरोधी पक्ष बनवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी भिवंडीकरांना केले आहे.

राज ठाकरे यांनी सांगितले की, 1982 मध्ये पहिल्यांदा भिवंडीत आलो होते. तेव्हा 12 वर्षे भिवंडीत शिवजयंती साजरी करायला बंदी होती. ती जेव्हा दिली, तेव्हा मी इथे आलो होतो. इथले रस्ते खराब झाले आहेत. कसे जगता तुम्ही? अशा थंड बसलेल्या लोकांचं नेतृत्व करायला मला आवडत नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा राग कसा येत नाही? मेक्सिकोमध्ये रस्ते चांगले नाही म्हणून तिथल्या मेयरला लोकांनी दोरीने बांधून फरफटत नेला. इथे इतकं सगळं होऊनसुद्धा आम्हाला राग येत नाही, असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

राज ठाकरे यांच्या सभेतील ठळक मुद्दे..

-आज सगळेच सत्तेची स्वप्न पाहत आहेत मात्र यांच्यावर कुणाचा वचक नसेल तर हे सरकार बेफाम होईल

-राजाने मारले आणि पावसाने झोडले तर तक्रार कुठं करायची मात्र या सरकारने झोडले तर तक्रार करता येते

-मी भिवंडीत अनेकदा आलो, रस्ते बघितले.. कसे जगताय तुम्ही. मला अ़सा थंड लोकांचे नेतृत्व करायला आवडत नाही. तुम्हाला राग कसा येत नाही

-मेक्सिकोत रस्ते चांगले केले नाही म्हणून मंत्र्याला रस्सीने बांधू फरफटत नेले मात्र इतक्या वर्षापासून तुम्हाला खड्ड्यात ढकलतायत राग कसा येत नाही.

-गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात चौदा हजार लोकांनी आत्महत्या केल्या आपल्याला जाणिवा आहे का?

-आपण धमाल मस्ती म्हणून निवडणुकीकडे बघतोय.

-भिवंडीत हातमागाचा मोठा व्यवसाय बंद होतोय

-पंजाब नॅशनल बँकेवाल्यांनी जवळच्यांना पैसे घेवून जायला सांगितले.

-बाकी मायबाप जनता रस्त्यावर

-सरकार आणि आरबीआय हमी घेवू शकत नाही तर परवानग्या का दिल्या

-भिवंडीत टोरेंट नावाची कंपनी गुजरातहून आली, चारशे रुपयांवरून आठ हजारांवर गेले इथे टाळ्या वाजवणाऱ्यांनी टोरेंट कंपनीच्या लोकांच्या गालावर दिले असते तर बर झालं असतं

-कल्याण ठाणे मुंबईतील रस्त्याची अवस्था झालीय, नाशिक मध्ये नाही

-कारण नाशिकच्या कंत्राटदारांना बोलवून सांगितले होते की जर रस्त्यावर खड्डे पडले तर खड्ड्यात उभा करुन मारेल.

-कंत्राटदारांना टक्केवारीसाठी रस्त्यावर खड्डे

-भाजपाची घोषणा होती 'कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र' आज मीच विचारतो 'कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र?'

-आपण वेडेवाकडे वागलो तर जनता आपल्याला घरी बसवेल ही भीतीच उरली नाही

-लोकसभेच्या निकालानंतर एका शब्दात वर्णन केले होते 'अनाकलनिय' कारण कळतच नाही कसे निवडून देतात

-तुमचा राग मतपेटीतून व्यक्त होवू द्या.. मी इतर राजकिय पक्षासारखा नाही

-मी रस्त्यावर उतरल्यावर 78 टोलनाके बंद केलेत.

-25-30 जागा लढवणाराही सत्ता मागतात, पण मी स्पष्ट बोलतो

रस्त्यावरचा विरोधी तुम्ही बघितला, आता विधानसभेतला विरोधीपक्ष दाखवायचा

-आपल्या पोलिसांच्या चेहर्‍यावरचा नूर गेलाय.. हसण्यावरती नेवू नका.. ते बंदोबस्तादरम्यान आपण कधी त्यांना हव नको ते विचारलंय का

-पोलिस पैसे खातात असं आपण म्हणतो पैसे कोण नाही खात

VIDEO : झुणका भाकर केंद्राच्या जमिनीचं काय झालं? आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल

First published: October 12, 2019, 8:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading