सत्ताधाऱ्यांची आश्वासनं नव्हे 'थापा' होत्या, राज ठाकरेंची उद्धव आणि मोदींवर टीका

सत्ताधाऱ्यांची आश्वासनं नव्हे 'थापा' होत्या, राज ठाकरेंची उद्धव आणि मोदींवर टीका

समुद्रात शिवस्मारक उभारणार होते त्याचे काय झाले? विरोधक पण काही विचारत नाही.

  • Share this:

कल्याण,12 ऑक्टोबर: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी कल्याणमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने नव्हे 'थापा' होत्या, अशा शब्दात राज यांनी सरकारचा समाचार घेतला. समुद्रात शिवस्मारक उभारणार होते त्याचे काय झाले? विरोधक पण काही विचारत नाही. समुद्रात काही तरी टाकलं, असे सांगून राज यांनी मोंदीलर शरसंधान साधले. पुतळे कसे उभे करताय, त्यापेक्षा गडकिल्ले जपा असा सल्ला द्यायलाही राज ठाकरे थांबले नाही.

मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेला सांगितले होते की, 6500 कोटी रुपयांचे पॅकेज देईन, अजून काहीच नाही पण विधानसभेत कुणी जाब विचारायला नाही. शिवछत्रपतींच्या समुद्रातील पुतळ्याबद्दल फक्त शिवस्मारक म्हणून निवडणुकांचा प्रचार सुरु आहे पण अजून काही घडलं नाही. माझं आजही ठाम मत आहे की शिवरायांचा पुतळ्यापेक्षा त्यांचा जिवंत इतिहास असलेले गडकिल्ले सुधारा, ती खरी महाराजांची स्मारकं आहेत. 30 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद होत असल्याने खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या जात आहेत आणि आता सरकारी पण, असे राज म्हणाले. भाजपची घोषणा होती की, 2014 ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?

शिवसेना-भाजप ह्या राजकीय पक्षांना शहरांमध्ये 25-25 वर्ष सत्ता देऊनही शहरात जो विकास घडवता आलं नाही त्याही पेक्षा उत्तम विकासकामं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फक्त 5 वर्षात करून दाखवली होती.

राज ठाकरे यांच्या कल्याणमधील सभेचे ठळक मुद्दे...

- महाराज राहिले बाजूला वल्लभ भाई उभे राहिले

-स्टूच्यू ॲाफ लिबिर्टी पेक्षा महाराजांचा टोप २ इंच उभं करायचा मग घोडा किती झाला

- पुतळा उभा करायला चायना वाल्यांना बोलायचे का

- राज ठाकरेंची प्रसार माध्यमांवर टीका

- चायनिज गोष्टी बंद केल्या, वल्लभ भाईंचा पुतळा चायनातून बनून आला

- डोकलाम माझ्या चायनाचे सैन्य घुसले हा गाजा वाजा केला. कारण वल्लभभाईंचा पुतळा चायनावरुन आणायचा होता ते दाबण्यासाठी

- कलम ३७० रद्द केला अभिनंदन. पण त्याचा महाराष्ट्राच्या विकासाशी त्याचा काय संबंध

- शेतक-यांच्या आत्महत्या किंवा सामाजिक समस्यांवर कोणी बोलत नाही

- रोजच्या समस्यांवर लक्ष विचलित करण्यासाठी देशभक्तीचा मुद्दा काढली जातो

- लोकही घरंगळत जातात

- गडकिल्ल्यांना लोकं काय आता दारु पिणार का?

- लोकं ही जाब विचारत नाही

- तो जाब मी विचारणार

- आघाडीचे नेतेच भाजपमध्ये गेले. सक्षम विरोधक नाही

- बॅंका बुडाले तरी चालतील, बाहेर जाऊन रडत बसतील पण बोलणार कोणीच नाही

- नाशिकला जे पाच वर्षात मनसेनं केलं ते कोणत्याही विशेष करुन शिवसेनेला २५ वर्षात जे जमलं नाही ते मी ५ वर्षात केलं होतं

- स्मार्ट सिटिवर कोणीही बोलत नाहीये

- पुण्यात राहता म्हणून सांगू नका पाण्यात राहता म्हणून सांगा

- माझ्यावर ९५ केसेस आहेत

- २० हजार बिहार युपीच्या लोकांना एका रात्रीत लाथ मारुन बाहेर काढलं गेलं

- पण प्रसार माध्यमांनी बातम्या केल्या नाही

- ज्याने हे केलं त्या अल्पेश ठाकूरला भाजपने पद देखील दिलं पक्षात घेऊन

- मी माझी भूमिका यूपी बिहार वाल्यांसमोर हिंदीत मांडली आणि त्यांना कळली ही

- मी कधीही आंदोलन अर्धवट सोडले नाही

- टोल आंदोलन केले तेव्हा ७८ आंदोलन बंद केलं

- सरकारने टोलमुक्त करण्याची घोषणा केली होती पण ती फक्त घोषणाच राहिली.

- गेल्या ५ वर्षात मनसेनं जेवढी आंदोलने केली तेवढी कोणत्या पक्षाने आंदोलने केली का?

VIDEO : पंकजा मुंडेंचा धनंजय यांच्यावर घणाघात, म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 09:50 PM IST

ताज्या बातम्या