प्रदीप शर्मा यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची केली दाऊदशी तुलना

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच राज्याभरात प्रचाराचा धुराळा उठण्यास सुरूवात झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 08:24 PM IST

प्रदीप शर्मा यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची केली दाऊदशी तुलना

विजय देसाई,(प्रतिनिधी)

नालासोपारा, 28 सप्टेंबर: विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच राज्याभरात प्रचाराचा धुराळा उठण्यास सुरूवात झाली आहे. राजकीय नेते आतापासूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा चिखलफेक करताना दिसत आहे. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाचा शिवसेना देऊन शिवसेनेत दाखल झाले आहेत. प्रदीप शर्मा यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची तुलना थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी केली आहे. मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष केलं म्हणून नाहीतर दाऊद पाठोपाठ यांनाही जावं लागलं असतं, असे वक्तव्य प्रदीप शर्मा यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना उद्देशून केले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत.

दरम्यान, नालासोपारा विधानसभा मतदारसंघ प्रदीप शर्मा यांच्या उमेदवारीमुळे गाजणार आहे. ते शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आहे. शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीच्या प्रतिष्ठेचा बनला आहे. आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

प्रदीप शर्मांनी आपल्या प्रचाराला सुरवात केली असून बहुजन विकास आघाडीच्या गुंडगिरीचा मुद्दा उकरून काढला आहे. मुंबई पोलिसांनी इकडे लक्ष दिले असते तर त्यांना इथून पाळण्याची वेळ आली असती, असे प्रदीप शर्मा यांनी म्हटले आहे.

प्रदीप शर्मा यांनी बविआ नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांची तुलना दाऊदशी केल्याने कार्यकर्ते पदाधिकारी संतापले आहेत. शर्मा यांनी केलेल्या टीकेला बहुजन विकास आघाडीने आता रोख ठोक ठोस उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. माजी उपमहापौर उमेश नाईक यांनी काजूपाडा येथे प्रदीप शर्मा यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, शर्मा मुळात त्यांचे गाव सोडून इकडे आले आहेत. ते काय कोणाला सोडायला लावणार त्याचे जे म्हणणं आहे हा त्यांचा गैरसमज आहे. त्यांच्या विरोधात राज्य सरकारने अपील केलं असून त्याचा निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे शर्मांनी अशा वल्गना करू नये, असा पलटवार उमेश नाईक यांनी केला आहे.

Loading...

VIDEO:अजित पवारांच्या आरोपांना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...