Elec-widget

हे पैसे कुणाचे? निवडणुकीचा माहोल, गुजरात मेलमधून तब्बल साडे सात कोटी जप्त

हे पैसे कुणाचे? निवडणुकीचा माहोल, गुजरात मेलमधून तब्बल साडे सात कोटी जप्त

पोलिसांनी हे सर्व पैसे इन्कम टॅक्स विभागाच्या स्वाधीन केले आहेत. ज्या लोकांना ताब्यात घेतलंय त्यांची चौकशी पोलीस करत आहे.

  • Share this:

मुंबई 02 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. वातावरण तापत आहे. अशातच पैशांचा खेळ सुरू झाल्याचं स्पष्ट होतंय. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सापडत असलेले पैसे पाहिले तर डोळे विस्फरून जाताहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईत गुजरात मेलमधून तब्बल साडेसात कोटींची रक्कम जप्त केलीय. आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर छापे घालायला सुरुवात केलीय. पोलिसांनी संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता एका व्यक्तिच्या बॅगमधून ही प्रचंड रक्कम सापडली. हे पैसे कुणाचे आहेत याचा शोध आता पोलीस घेत आहेत. ही ट्रेन मुंबईवरून गुजरातला जात होती. पोलिसांनी हे सर्व पैसे इन्कम टॅक्स विभागाच्या स्वाधीन केले आहेत. ज्या लोकांना ताब्यात घेतलंय त्यांची चौकशी पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आलीय.

महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बातमी, एकनाथ खडसेंचा पत्ता कट होणार?

विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा प्रत्येक उमेदवाराला ही 28 लाख रुपये येवढी आहे. ती मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी केली जातेय. निवडणूक आयोगाने घेतलेल्या बैठकींमध्ये अनेक राजकीय पक्षांनी ही मर्यादा 40 लाखांपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी केली होती. मात्र आयोगाने ही मर्यादा वाढवून दिली नाही.

सध्याची निवडणुक ही अतिशय खर्चाची झाली आहे. प्रचंड वाढलेली महागाई, निवडणूक साहित्याचा वाढता खर्च, मतदारसंघाचा आकार जास्त असल्याने उमेदवारांना प्रवासही भरपूर करावा लागतो. त्यामुळे ही मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी राजकीय पक्षांनी केली होती. मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्याही वाढली असून प्रत्येकाला साधं पोस्ट कार्ड जरी पाठवायचं म्हटलं तरी मोठा खर्च होते असा युक्तिवादही निवडणूक आयोगाला करण्यात आला होता. मात्र त्याचा फायदा झाला नाही.

आदित्य ठाकरेंचा 'केम छो'च्या डावावर विरोधकांचा 'मराठी' बाणा... असं रंगलं राजकारण

Loading...

भिवंडीत आचारसंहिता पथकाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाका बंदी दरम्यान विविध दोन घटनांमध्ये कार मधून 30 लाखांची रोकड जप्त केलीय. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. जुन्या मुंबई -नाशिक मार्गावरील चांविद्रा नाक्यावर पोलिसांनी ही कारवाई केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 09:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...