Elec-widget

पैशांचा खेळ सुरू, भिवंडीत भरारी पथकानं जप्त केली 20 लाखांची रोकड

पैशांचा खेळ सुरू, भिवंडीत भरारी पथकानं जप्त केली 20 लाखांची रोकड

गेल्या काही दिवसांमध्ये भिवंडीत भरारी पथकाने 30 लाखांची रक्कम जप्त केलीय.

  • Share this:

रवी शिंदे, भिवंडी 30 सप्टेंबर : निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय. प्रचाराला सुरुवात होणं बाकी आहे.पण राज्यात आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांनी नाकाबंदी केलीय. पण प्रचार तापण्याआधीच पैशांचा खेळ सुरू झालाय. भिवंडीत आचारसंहिता पथकाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी दरम्यान एका कार मधून 20 लाखांची रक्कम जप्त करण्यात आलीय. विशेष भरारी  पथकाचे प्रमुख नाना झळके यांच्या पथकाने वाहन  पथकामार्फत साईबाबा नाका इथं तपासणी दरम्यान ही कारवाई केलीय. काही आठवड्यांपूर्वीच या पथकांनी भिवंडीत 10 लाखांची रक्कम जप्त केली होती.

अनामत रक्कम आणली कॅरी बॅगमध्ये, उमेदवाराला भरावा लागला 5 हजारांचा दंड

निवडणुका म्हटलं की खर्च आला आणि खर्च करायचं म्हटलं की पैसे पाहिजे. निवडणुका या पैशांचा खेळ झाल्याचा आरोप वारंवार करण्यात येतो. सर्वाधिक पैसे खर्च केले जातात ते निवडणुकीच्या काळात. प्रत्येक निवडणुकीत कोट्यवधींची रक्कम जप्त केली जाते. त्याचे आकडे पाहिले तरी डोळे विस्फरून जातात. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत होणारा पैशांचा खेळ रोखण्यासाठी Income Tax विभागाने कंबर कसलीय. निवडणुकीच्या काळात  काळ्या पैशाची देवाण-घेवाण होत असते. अश्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयकर विभागाणे शिघ्र कृती दलाची स्थापना केलीय.

कसा आहे आदित्य ठाकरेंच्या 'वरळी' मतदारसंघाचा इतिहास?

(Quick Response Team) राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथकं स्थापन करण्यात आली आहेत. या क्विक रिस्पॉन्स टीम सोबतच आयकर विभागाणे  कंट्रोल रूम देखील तयार केली आहे. काळ्या पैश्याची देवघेवाण करताना कुणाला आढळल्यास नागरिकांनी कंट्रोल रूम ला त्याची माहिती द्यावी. असं आवाहन Income Tax विभागाने केलंय.

Loading...

विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा प्रत्येक उमेदवाराला ही 28 लाख रुपये येवढी आहे. ती मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी केली जातेय. निवडणूक आयोगाने घेतलेल्या बैठकींमध्ये अनेक राजकीय पक्षांनी ही मर्यादा 40 लाखांपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी केली होती. मात्र आयोगाने ही मर्यादा वाढवून दिली नाही.

'वंचित'ची दुसरी यादी जाहीर, गिरीश महाजन, अशोक चव्हाणांविरोधात दिले 'हे' उमेदवार

सध्याची निवडणुक ही अतिशय खर्चाची झाली आहे. प्रचंड वाढलेली महागाई, निवडणूक साहित्याचा वाढता खर्च, मतदारसंघाचा आकार जास्त असल्याने उमेदवारांना प्रवासही भरपूर करावा लागतो. त्यामुळे ही मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी राजकीय पक्षांनी केली होती. मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्याही वाढली असून प्रत्येकाला साधं पोस्ट कार्ड जरी पाठवायचं म्हटलं तरी मोठा खर्च होते असा युक्तिवादही निवडणूक आयोगाला करण्यात आला होता. मात्र त्याचा फायदा झाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 10:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...