नरेंद्र मोदींच्या जाहीर सभांचा महायुतीला कमी भाजपलाच जास्त फायदा

नरेंद्र मोदींच्या जाहीर सभांचा महायुतीला कमी भाजपलाच जास्त फायदा

नरेंद्र मोदी परळीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा प्रचार करणार आहेत.

  • Share this:

मुंबई,9 ऑक्टोंबर: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नऊ प्रचारसभा घेणार आहे. राज्यात भाजप-शिवसेना आणि रिपाइंसह इतर मित्र पक्षांची महायुती आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनात नरेंद्र मोदी सभेला संबोधित करणार आहेत. मात्र, नरेंद्र मोदींच्या जाहीर सभांचा 'महायुती'ला कमी भाजपलाच जास्त फायदा होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा 13 ऑक्टोबरला जळगाव येथे होणार आहे. त्याच दिवशी नरेंद्र मोदी विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील सभेला संबोधित करतील. 16 ऑक्टोबरला अकोला, परतूर (जि. जालना) आणि पनवेल (नवी मुंबई) अशा तीन सभांना संबोधित करणार आहेत. नंतर परळी (जि.बीड), सातारा आणि पुणे येथी 17 ऑक्टोबरला जाहीर सभा घेतील. नरेंद्र मोदी 18 ऑक्टोबरला मुंबईतल्या वांद्रये-कुर्ला कॉम्पलेक्समधील सभेला संबोधित करतील.

नरेंद्र मोदी यांची पहिली सभा 13 ऑक्टोबरला जळगाव येथे होणार आहे. भाजपचा गड म्हणून जळगाव जिल्ह्याची नवी ओळख समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 11 मतदार संघ आहेत. त्यापैकी 7 मतदार संघात भाजपचे तर 4 मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार रिंगणात उतरले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या सभेचा सर्वाधिक फायदा भाजपलाच होणार आहे. नरेंद्र मोदी यांची दुसरी सभा 13 ऑक्टोबरलाच विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे होणार आहे. भंडारा जिल्ह्यात 6 मतदार संघ आहेत. सर्व मतदार संघात भाजपचे उमेदवार उभे आहेत. जागावाटपात या भंडारा जिल्ह्यात शिवसेनेसाठी एकही जागा सोडणात आलेली नाही.

नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला अकोला, परतूर (जि.जालना) आणि पनवेल (नवी मुंबई) अशा तीन सभांना संबोधित करणार आहेत. अकोला जिल्ह्यात 7 मतदार संघ आहेत. त्यापैकी 5 मतदार संघात भाजपचे तर 2 मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. जालन्यात 5 मतदार संघात 3 जागांवर भाजप तर 2 जागांवर शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. तर नवी मुंबईतील पनवेल येथे नरेंद्र मोदी भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थनात सभा घेत आहेत.

17 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी परळी, (जि.बीड), सातारा आणि पुण्यात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी परळीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा प्रचार करणार आहेत. सातारा येथे लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले निवडणूक रिंगणात आहे. खास त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी जाहीर सभा घेत आहेत. उदयनराजे भोसले यांना शह देण्यासाठी श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. आधी कॉंग्रेसने ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 15 जागांवर भाजप तर 6 जागावर शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. मोदींच्या या सभेचा भाजपच्याच उमेदवारांना होणार आहे.

कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यांना ब्राह्मण महासभेने विरोध दर्शवला होता. परंतु, चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण महासभेच्या पदाधिककाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे समर्थन मिळवले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदींची शेवटची सभा 18 ऑक्टोबरला मुंबईतल्या वांद्रये-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये होणार आहे. मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला 126 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यातील काही जागा निसटल्यामुळे काही नेते नाराज झाले आहेत. त्यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व हळूहळू कमी होतांना दिसत आहे.

महाराष्ट्रात होणाऱ्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, स्टार प्रचारक आणि भाजपाध्यक्ष अमित शहा 18 सभांना संबोधित करणार आहेत. शहा यांची पहिली सभा लातूर जिल्ह्यातून होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी पर्सनल असिस्टंट (पीए) अभिमन्यु पवार औसा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

राज ठाकरेंच्या पहिल्या सभेत पाणीच पाणी, पाहा हा LIVE VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: October 9, 2019, 8:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading