आई आमदार व्हावी म्हणून मुलाने घेतली रिंगणातून माघार!

आई आमदार व्हावी म्हणून मुलाने घेतली रिंगणातून माघार!

आई राष्ट्रवादीच्या आमदार तर सुनबाई भाजपच्या महापौर. मुलाचा स्वतंत्र गट. उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबात सर्वच पक्षांचे सदस्य आहेत.

  • Share this:

गणेश गायकवाड, उल्हासनगर 07 ऑक्टोंबर : विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने अनेक मतदारसंघांमधलं चित्र आता स्पष्ट होत आहे. ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांच्यासाठी त्यांच्या मुलाने माघार घेतली होती. तर आता उल्हासनगरमध्ये आई आमदार व्हावी यासाठी मुलाने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलीय. उल्हासनगरच्या राजकारणात कलानी कुटुंबीयांचं वर्चस्व आहे. ज्योती कलानी यांना पुन्हा आमदारकी मिळावी यासाठी त्यांचा मुलगा ओमी कलानी यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतलाय. उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाचे सदस्य हे भाजप आणि राष्ट्रवादीच्या जवळचे आहेत. ज्योती कलानी या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार आहेत. तर ओमी कलानी यांची पत्नी पंचम या भाजपच्या महापौर आहेत.

वाचा- 'युती'ला धडा शिकविण्यासाठी 'मनसे' राष्ट्रवादीची छुपी खेळी!

पंचम यांना विधानसभेसाठी उल्हासनगगरमधून तिकीट देण्याचं आश्वासन भाजपने दिलं होतं. मात्र नंतर कुमार एलानी यांना तिकीट दिलं. ओमीला भाजपचं तिकीट मिळेल या आशेने ज्योती कलानी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. मात्र तिकीट भाजपने दुसऱ्याचं उमेदवाराला दिलं हे स्पष्ट झाल्यावर ज्योती यांनी पुन्हा राष्ट्रवादीकडून AB फॉर्म आणण्यात यश मिळवलं.

ज्योती कलानींच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीने  भरत गंगोत्री यांना तयारी करण्याचे आदेश दिले होते. पण आता सगळंच चित्र बदललं आहे. टिम ओमी कलानी गटाकडून ओमी कलानींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. ते कायम राहिले असते तर त्यांच्या पत्नी पंचम यांची उमेदवारी धोक्यात आली असती. त्यामुळे शेवटी ओमी यांनी रिंगणातून माघार घेतली. आता उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार एलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्यात थेट लढत होणार आहे.

'भाजपने आम्हाला धोका दिला', विधानसभेसाठी महादेव जानकरांनी जाहीर केली भूमिका

मनसे-राष्ट्रवादी छुपी मदत

विधानसभेच्या निवडणुका मनसे स्वतंत्रपणे लढवत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा मनसेला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट झालंय. मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादीने अनेक काही ठिकाणी आपल्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली तर काही ठिकाणी त्यांनी उमेदवारच उभे केले नाहीत. ठाणे शहर आणि कल्याण ग्रामीण या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार मागे घेतल्याने आता मनसे विरुद्ध भाजप किंवा शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी आणि मनसेची ही खेळी आता किती रंगत आणणार हे निवडणुकीत दिसणार आहे. ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनाच भाजपने तिकीट दिलंय. तिथे राष्ट्रवादीचे सुहास देसाई यांनी माघार घेतलीय त्यामुळे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 7, 2019, 4:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading