मुंबई 01 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला 20 दिवस राहिले असताना भारतीय जनत पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या पहिल्या यादीत भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांना स्थान दिलंय. तर विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपने केलेल्या सर्व्हेत काही उमेदवारांबाबत लोकांचा नकारात्मक सूर आला होता. त्यामुळे अशा नेत्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आलाय. तर दिग्गज उमेदवारांमध्ये नागपूर दक्षिण-पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, कोथरूड - चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे भोसले, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आलीय. या यादीत अनेक नवे चेहेरे असून भाजपने डावपेच आखत डाव खेळलाय.
महायुतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे करतील असं असं सांगण्यात आलं होतं. मात्र बंडखोरीची शक्यता आणि अवघड प्रश्नांची उत्तरं टाळण्यासाठी महायुतीची घोषणा पत्रकाद्वारेच करण्यात आली. तर जागावाटप करतानांही फार गाजावाजा करण्यात आला नाही. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात भाजपला 146, शिवसेनेना 124 तर मित्र पक्षांना 18 जागा देण्यात आल्या आहेत.
'पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केलाय';खडसेंची पहिली प्रतिक्रिया
हे आहेत भाजपच्या यादीतले नवे चेहेरे
मुक्ता टिळक
भारत गावित
वैभव पिचड
कालिदास कोळंबकर
हर्षवर्धन पाटील
राधा कृष्ण विखे पाटील
राणा जगजितसिंह
जयकुमार गोरे
शिवेंद्रसिंहराजे भोसले
125 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आलीय. यामध्ये 12 महिला आमदारांचा समावेश आहे. तब्बल 12 विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आलाय. तर 12 मतदारसंघांची अदलाबदल करण्यात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय. पहिल्या यादीत खडसे आणि विनोद तावडे यांचं नाव देण्यात आलेलं नाही. तर सरदार तारासिंग, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी यांचा उमेदवारीचा पत्ता कट झालाय. पुण्यातल्या सर्व आठ मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उभे राहणार आहेत. कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक, कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, साताऱ्यातून शिवेंद्रराजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
असा आहे निवडणुकांचा कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.
- उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.
- उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर
- उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार
- 2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा