'भारतरत्न' म्हणजे हे सरकारचं इलेक्शन गिमिक,सुप्रिया सुळेंची सरकारवर घणाघाती टीका

'भारतरत्न' म्हणजे हे सरकारचं इलेक्शन गिमिक,सुप्रिया सुळेंची सरकारवर घणाघाती टीका

भाजपच्या संकल्पनाम्याची 'गाजरांचा पाऊस' म्हणूनही त्यांनी खिल्ली उडवली.

  • Share this:

प्रदीप भणगे,(प्रतिनिधी)

कल्याण,15 ऑक्टोबर: 'भारतरत्न' हे सरकारचं 'इलेक्शन गिमिक' असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. कल्याणमध्ये मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेनंतर सुप्रीया सुळे यांनी ही टीका केली. भाजपच्या संकल्पनाम्याची 'गाजरांचा पाऊस' म्हणूनही त्यांनी खिल्ली उडवली.

भाजपनं आजच आपला संकल्पनामा जाहीर केला असून यात स्वातंत्रवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचं म्हटलंय. मात्र, प्रत्यक्षात आपण ही मागणी मागील 2 ते 3 वर्षांपासून लोकसभेत करत होते. त्यावेळीही यांचंच सरकार होतं, मग निवडणुका आल्यावरच यांना भारतरत्न का आठवला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. भाजपचा संकल्पनामा म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस असल्याची टीकाही त्यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेवरून सध्या सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं सांगत भूतकाळ पुन्हा उकरून काढण्यापेक्षा वर्तमानात आपल्यापुढे काय समस्या आहेत? त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसंच महाराष्ट्रात जर तुमचं इतकं चांगलं काम असेल, आणि पैलवान तयार असतील, तर दिल्लीवरून मॉनिटर कशाला बोलवावे लागतात? असा सवाल उपस्थित करत सुप्रीया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला.

अजित पवारांच्या राजीनाम्यावर भुजबळांची स्फोटक प्रतिक्रिया

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या विषयावरून आता राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांची आपापसात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. बाळासाहेबांच्या अटकेला विरोध होता पण विभागप्रमुखांच्या हट्टामुळे कारवाई झाली, असं सांगत थेट छगन भुजबळ यांच्यावरच खापर फोडलं होतं. यास आता भुजबळांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. पवारांच्या याच जखमेवर बोट ठेवत भुजबळ म्हणालेत की,'शरद पवार ज्या दिवशी ईडी कार्यालयात जाणार होते, त्याच दिवशी अजित पवारांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे फोकस बदलला',अशा शब्दांत भुजबळांनी अजित पवारांवर निशाणा साधला. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत भुजबळांनी हे विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद मात्र काही संपता संपत नाहीयेत.

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

'ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ईडी कार्यालयात जाणार होते. त्याच दिवशी अजित पवारांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नव्हती. बँकेचं सदस्य आणि संचालक नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे वातावरण तापलं. पण काही वेळानं वातावरण बदललं आणि फोकसही बदलला. अजित पवार भावनाप्रधान आहेत हे मान्य पण दोन दिवस भावना आवरल्या असतं तर बरं झालं असतं', असं म्हणत भुजबळांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

VIDEO : इक्बाल मिर्ची प्रकरणी ईडी चौकशीवर प्रफुल्ल पटेल म्हणतात...

Published by: Sandip Parolekar
First published: October 15, 2019, 9:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading