'दाऊदचे लोक भाजपमध्ये... हा खासदार जेजे हत्याकांडातील आरोपी'

'दाऊदचे लोक भाजपमध्ये... हा खासदार जेजे हत्याकांडातील आरोपी'

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित लोक भाजपमध्ये आहेत, तसेच भाजपच्या आयटी सेलमध्ये 'सीआयए'चे एजंट असल्याचा खळबळजनक आरोप आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंके,(प्रतिनिधी)

मुंबई,23सप्टेंबर: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित लोक भाजपमध्ये आहेत, तसेच भाजपच्या आयटी सेलमध्ये 'सीआयए'चे एजंट असल्याचा खळबळजनक आरोप आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. गोंडयाचे खासदार बीजभूषण शरणसिंग हे जेजे हत्याकांडातील आरोपी असल्याचीही माहिती मलिक यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचा वेगळा जाहीरनामा नाही..

नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले की, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगळा जाहीरनामा जाहीर होणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त जाहीरनामा सोमवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात 125/125 जागांचा फॉर्म्युला पक्का झाला आहे. युतीचे अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. मनसे लोकसभेमध्ये आमच्या सोबत नव्हते, आता विधानसभामध्येही मनसे आमच्यासोबत नाही, असेही नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

अमित शहा खोटं बोलतात...

नवाब मलिक यांनी यावेळी भाजप सरकारवर खोचक टीका केली. गृहमंत्री अमित शहा यांनी खोटं बोलतात. काश्मीरमध्ये भारताचा झेंडा फडकतोय असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय आणि शिवसेना भवनावर भारताचा तिरंगा कधी फडकला ते देखील अमित शहा यांनी सांगितले. कलम 370 च्या मागे काश्मीर आणि गुलबर्गाची जागा उद्योगपतींना देण्याचा सत्ताधारी सरकारचा डाव आहे. भाजपने नागालंडला वेगळा झेंडा का दिला? वेगळा पासपोर्ट का दिला? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपचा राष्ट्रवाद खोटा..

मेट्रोची कामं आघाडीच्या काळात सुरू झाली. भाजपचा राष्ट्रवाद खोटा आहे, आम्ही खरे राष्ट्रवादी असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. मोदी सरकारमुळे शेतकऱ्यांचा कांदा आणि साखर धोक्यात आली आहे.

VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

Published by: Sandip Parolekar
First published: September 23, 2019, 3:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading