शरद पवारांचे भावनिक Tweet, म्हणाले.. 'मला आणखी काही नको, महाराष्ट्रासाठी...'

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 03:03 PM IST

शरद पवारांचे भावनिक Tweet, म्हणाले.. 'मला आणखी काही नको, महाराष्ट्रासाठी...'

मुंबई,21 सप्टेंबर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला एका टप्प्यात मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भावनिक ट्वीट (Tweet) केले आहे. 'मला आणखी काही नको. महाराष्ट्राने मला भरभरुन दिले आहे. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे,' असे पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 'राज्यातील जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केले, देशाचा संरक्षण मंत्री केले, 10 वर्षे कृषीमंत्री केले. जनतेने मला भरभरुन दिले आहे. आता मला आणखी काही नको.' असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

Loading...

राज्यात आजपासून आचारसंहिता लागू...

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात 8.94 कोटी मतदार असून 1.8 लाख ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया 2 नोव्हेंबरपर्यंत होणार पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम..

-अर्ज भरण्याची तारीख : 27 सप्टेंबर

-अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर

-अर्ज छाननी : 5 ऑक्टोबर

-अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोबर

-मतदानाची तारीख : 21 ऑक्टोबर

-निकाल : 24 ऑक्टोबर

2014 मधील पक्षीय बलाबल

-भाजप - 122 जागा

-शिवसेना - 63 जागा

-काँग्रेस - 42 जागा

-राष्ट्रवादी काँग्रेस - 41 जागा

-इतर - 20 जागा

-एकूण - 288 जागा

VIDEO: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 03:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...