नारायण राणेंच्या पक्षातील या नेत्याने 'मातोश्री'वर जाऊन बांधले 'शिवबंधन'

आपला भाजपप्रवेश निश्चित असल्याचे राणे यांनी जाहीर केले असले तरी भाजपचा मित्रपक्ष शिवसेनाचा सुरुवातीपासून विरोध आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 06:58 PM IST

नारायण राणेंच्या पक्षातील या नेत्याने 'मातोश्री'वर जाऊन बांधले 'शिवबंधन'

मुंबई,21 सप्टेंबर:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला असून आपला भाजप प्रवेश निश्चित असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केले आहे. मात्र, दुसरीकडे सिंधुदुर्गाच्या स्थानिक राजकारण वेगळे वळण घेत आहे. नारायण राणे यांचा पक्ष 'महाराष्ट्र् स्वाभिमान'चे मालवण तालुका अध्यक्ष आणि नगरसेवक मंदार केणी यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंदार केणी यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.

हे तीन नगरसेवकही शिवसेनेच्या गळाला..

मंदार केणी यांच्या पाठोपाठ आणखी तीन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. महाराष्ट्र् स्वाभिमानचे नगरसेवक यतीन खोत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शैलजा गिरकर आणि दर्शना कासवकर यांनीही शिवसेनेची वाट धरली आहे.

..तर राणेंच्या विरोधात आपला उमेदवार उभा करेल!

आपला भाजपप्रवेश निश्चित असल्याचे राणे यांनी जाहीर केले असले तरी भाजपचा मित्रपक्ष शिवसेनाचा सुरुवातीपासून विरोध आहे. विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या मुलांना उमेदवारी मिळाली तर शिवसेना आपला उमेदवार उभा करेल, अशा इशारा शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केले होते. तर नारायण राणे भाजपमध्ये गेले तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही, असे खोचक वक्तव्य शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

Loading...

नारायण राणे आपल्या मुलांच्या स्वार्थासाठी भाजपत जात आहेत. लोकांना ते माहीत आहे. राणे भाजपमध्ये गेले तर कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार नाहीत. राणेंचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर असून ते लवकरच सेनेत प्रवेश करतील, असा दावा आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

VIDEO:सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया

https://lokmat.news18.com/video/chandrakant-patil-on-udayanraje-bhosle-and-satara-lok-sabha-by-poll-election-mhss-408941.html

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 06:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...