5 वर्षांत राजीनामे खिशातून निघाले नाहीत, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला

5 वर्षांत राजीनामे खिशातून निघाले नाहीत, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला

शिवसेना-भाजप होर्डिंगच्या खाली लिहिलंय 'हीच ती वेळ', यावरून राज यांनी टोला लगावला.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दहिसरमध्ये येथे सभा सुरू आहे. राज यांनी त्यांनी शिवसेना-भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शिवसेना-भाजप होर्डिंगच्या खाली लिहिलंय 'हीच ती वेळ', यावरून राज यांनी टोला लगावला. राज म्हणाले, मग 5 वर्षे वेळ नव्हता का? गेली 5 वर्ष यांना खिशातले राजीनामे बाहेर काढता आले नाहीत. फक्त धमक्या दिल्या. त्या धमक्याही फक्त पैशाचे काम अडले की देतात.

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...

-देश चालवता येत नाही, म्हणून मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेकडून 1 लाख 70 हजार कोटी घेतले. हे तुमचे पैसे आहेत. मोदी सरकारने नोटबंदी केली, त्यानंतर 10 दिवसांत मी बोललो होतो की निर्णय चुकला, तर देश खड्ड्यात जाईल. आज 3 कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत.

-यवतमाळ कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला जिल्हा. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखू असं सांगून सत्तेत येणाऱ्या सरकारच्या काळात गेल्या 5 वर्षांत 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आज मुख्यमंत्र्यांची सभा असताना भाजपचा टीशर्ट घालून एका 35 वर्षांच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली.

-तुमच्या हातात बहुमत असताना उद्योगधंदे बंद का पडत आहेत? पारले जी कंपनीनं सांगितलं 10 हजार लोकं आम्ही काढून टाकणार. प्रत्येकाच्या घरी 4 लोकं म्हटलं, तर त्या 40 हजार लोकांनी करायचं काय?

-सहकारी बँकांकडून फसवणूक होत असल्यावर ना सरकारचं नियंत्रण, ना रिझर्व्ह बँकेचं. सरकार म्हणतं, रिझर्व्ह बँकेचं काम आहे. रिझर्व्ह बँक म्हणते, सरकारी बँका आमच्या आखत्यारीत, को ऑपरेटिव्ह बँकांशी आमचा संबंध नाही. जर आरबीआयकडून सरकार पैसे काढू शकतं, तर सामान्य खासदार का काढू शकत नाही?

-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार नालायक म्हणून यांच्या हातात सत्ता दिली. भाजप-सेनेने 2014 च्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासनं दिली होती. सहकाराला आर्थिक शिस्त लावण्यासाठी नवा सहकार कायदा आणणार होते. भ्रष्टाचाराबद्दल गुन्हे दाखल करून वसुली करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणार होते. कोणती व्यवस्था आणली? सिटी को ऑपरेटिव्ह बँकेवर शिवसेनेचे खासदार अनंत अडसूळ आहेत. तुमचे पैसे बुडाले. आणि यांनी आता हात वर केले.

-शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करून काही होणार नाही. शिवछत्रपतींचं खरं स्मारक कुठलं असेल, तर ते त्यांचे गडकिल्ले आहेत. ते वाचवायला हवेत. त्या किल्ल्यांचं संवर्धन व्हायला हवं. पण त्याच्यावरच खेळ सुरू आहे. समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं? हे कुणीही विचारणार नाही.

- मुंबई-ठाण्यात खड्डे आहेत. नाशिकमध्ये खड्डे आहेत का ते जाऊन पाहा|

-शिवसेना-भाजपनं जाहीरनाम्यात म्हटलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. पण त्याचं नंतर काहीही झालं नाही. सरकारची काहीच जबाबदारी नाही का?

-कामावर मतदान होतच नाही. पण कितीही तुम्हाला त्रास झाला, तरी पुन्हा भावनेच्या आधारावरच मतदान होतं.

-शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करून काही होणार नाही. शिवछत्रपतींचं खरं स्मारक कुठलं असेल, तर ते त्यांचे गडकिल्ले आहेत. ते वाचवायला हवेत. त्या किल्ल्यांचं संवर्धन व्हायला हवं. पण त्याच्यावरच खेळ सुरू आहे. समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं? हे कुणीही विचारणार नाही.

आरेमधली झाडं कापल्यावर शिवसेनेचे प्रमुख म्हणतात, 'सत्ता आल्यावर आम्ही तिथे जंगल म्हणून घोषित करू. नंतर काय गवत लावणार का तिथे?' शिवसेनेच्या यंदाच्या जाहीरनाम्यामध्ये आरेबद्दल काहीही उल्लेख नाही.

-मुंबई-ठाण्यात खड्डे आहेत. नाशिकमध्ये खड्डे आहेत का ते जाऊन पाहा

-गुजरातमधून 2018 मध्ये जेव्हा 20 हजार बिहारींना मारून बाहेर हाकलण्यात आलं, तेव्हा तिथे केसेस झाल्या नाहीत. पण मी जेव्हा बोलतो, तेव्हा ते दिसतं. तिथे बिहारींना मारणाऱ्या अल्पेश ठाकूरला नंतर भाजपमध्ये प्रवेश दिला गेला.

-शिवसेना-भाजपनं जाहीरनाम्यात म्हटलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. पण त्याचं नंतर काहीही झालं नाही. सरकारची काहीच जबाबदारी नाही का?

-शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करून काही होणार नाही. शिवछत्रपतींचं खरं स्मारक कुठलं असेल, तर ते त्यांचे गडकिल्ले आहेत. ते वाचवायला हवेत. त्या किल्ल्यांचं संवर्धन व्हायला हवं. पण त्याच्यावरच खेळ सुरू आहे. समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं? हे कुणीही विचारणार नाही.

VIDEO: 40 वर्षांत तुम्ही काय केलं? गवत उपटलं; पक्ष सोडून गेलेल्यांवर पवारांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 08:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading