EDचौकशीनंतर राज ठाकरेंची मुंबईत पहिलीच जाहीर सभा, 'राज'गर्जनेतील महत्त्वाचे मुद्दे

ईडी चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे येथे पहिलीच जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी जनतेकडे अनोखीच मागणी केली.

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2019 08:53 PM IST

EDचौकशीनंतर राज ठाकरेंची मुंबईत पहिलीच जाहीर सभा, 'राज'गर्जनेतील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई, 10 ऑक्टोबर : ईडी चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे येथे पहिलीच जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी जनतेकडे अनोखीच मागणी केली. ' मी या विधानसभेला तुमच्याकडे एक मागणं घेऊन आलोय. ते मागणं म्हणजे, या राज्याला गरज आहे सक्षम, प्रबळ, कोणासमोर न घरंगळत जाणारा विरोधी हवाय. सत्तेतला आमदार सरकारला प्रश्न विचारू शकत नाही पण विरोधी पक्षातला आमदार सरकारला नामोहरम करू शकतो,मी आज प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर येतोय',अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

1. बुधवारी (9 ऑक्टोबर) पुण्याची सभा वादळी पाऊसामुळे रद्द करावी लागली. त्यात काल पीएमटी बस चालक बसवर झाड पडून मृत्युमुखी पडला. बघा काय अवस्था आहे आपली. घराबाहेर पडल्यावर काय होईल माहीत नाही. पुण्यासारख्या शहराची ही अवस्था. अर्ध्या तासाच्या पावसाने शहराचा पार विचका झाला. तर इथे ठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. काय दुर्दैवी घटना आहे ही.

2. शहरांचं नियोजन कोसळलंय, निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाटेल ती आश्वासन दिली जातात. पुन्हा परिस्थिती जैसे थे. आणि विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधारी पक्षात जाऊन बसतात आणि सत्ताधारी आमदारांची हिंमत नाही सरकारला प्रश्न विचारायची, मग तुमचे प्रश्न मांडणार कोण?

3. पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण? तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतं, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?

Loading...

(वाचा :  मला सत्ता मिळणं शक्य नाही, 'मनसे'ला विरोधी पक्ष बनवा - राज ठाकरे)

(वाचा :  मोदीजी को भगवान मानते थे... हम डूब गए; मदतीसाठी रडणाऱ्या महिलेचा VIDEO व्हायरल)

4. आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत.. बेरोजगारी टोकाला आहे, उद्योग बंद पडत आहेत. काय झालंय लोकांना? त्यांच्या जाणिवांना? बाबासाहेब पुरंदरे एक वाक्य नेहमी म्हणतात,'जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेतं'. ह्या सगळ्या घटना बघितलं की वाटतं, आपल्या जाणिवा शून्य झाल्यात आपण फक्त प्रेतं झालो आहोत? आणि जर विरोधी पक्षातले नेते सरकारसमोर घरंगळत जाणार असतील आणि जनता सुद्धा सरकारला जाब विचारणार नसेल तर ह्या सरकारला प्रश्न विचारणार तरी कोण आहे?

(वाचा : महायुतीच्या विरोधातील बंडखोरी करणाऱ्या नेत्यांनी भाजपने दाखवला घराचा रस्ता)

5. मी या विधानसभेला तुमच्याकडे एक मागणं घेऊन आलोय; ते मागणं म्हणजे, ह्या राज्याला गरज आहे सक्षम, प्रबळ, कोणासमोर न घरंगळत जाणारा विरोधी आवाज हवाय. सत्तेतला आमदार सरकारला प्रश्न विचारू शकत नाही पण विरोधी पक्षातला आमदार सरकारला नामोहरम करू शकतो, मी आज प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर येतोय

6. माझे उमेदवार तरुण आहेत त्यांच्या पोटात आग आहे, त्यांना संधी द्या, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, ते तुमच्यासाठी आवाज उठवतील, सरकारला सळो की पळो करून सोडतील... सत्ताधारी आमदार कामं करत नाहीत हे आता उघड झालं आहे पण माझे विरोधी पक्षात बसलेले आमदार सरकारकडून कामं करून घेतील.

VIDEO : राज ठाकरेंचा रोख कुणावर? विधानसभा निवडणुकीतलं पहिलं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 08:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...