गुंडशाहीविरुद्ध लोकशाहीचा सच्चासेवक.. या एन्काऊंटर स्पेशालिस्टचा जोरदार प्रचार

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनाचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रदीप शर्मा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2019 09:25 AM IST

गुंडशाहीविरुद्ध लोकशाहीचा सच्चासेवक.. या एन्काऊंटर स्पेशालिस्टचा जोरदार प्रचार

विजय देसाई, (प्रतिनिधी)

विरार,1 सप्टेंबर: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनाचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रदीप शर्मा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वीच प्रदीप शर्मा यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.

नालासोपारा विधानसभेच्या जागेसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. प्रदीप शर्मा यांचा फोटो असलेले 'गुंडशाहीविरुद्ध लोकशाहीचा सच्चासेवक' असे बॅनर, पोस्टर्स सर्वत्र लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवात मतदार संघातील कोकणी बांधवांना खूश करण्यासाठी शिवसेनेने जादा बस सोडल्या आहेत. 100, 150, 200 असे नाममात्र तिकीट दर ठेवले आहेत. त्यामुळे अनेक चाकरमान्यांनी याचा लाभ मिळत आहे. यामुळे विरोधकांचे धाबे चांगलेच दणाणले असल्याने सेनेने दिलेल्या सेवेवर टीका करत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

गणेशोत्सव हा प्रत्येक कोकणी माणसाचा जीव की प्राण असतो. वसई-विरारमध्ये मोठ्याप्रमाणात कोकणी बांधव राहतात. त्यांना खुश करण्यासाठी नालासोपारा, विरार शिवसेना पीएस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणात 47 बसेस सोडण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते 'गुंडशाहीविरुद्ध लोकशाहीचा सच्चासेवक' आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. श्रीफळ फोडून बसेस सोडण्यात आल्या. 2 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार असून मुंबईतील चाकरमाने बाप्पाच्या सेवेसाठी गावी निघाले आहेत.

चकमकफेक अधिकारी अशी ओळख..

Loading...

प्रदीप शर्मा यांची 'चकमकफेक' अधिकारी अशी ओळख आहे. 1983 मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलात दाखल झाले होते. शर्मांनी आत्तापर्यंत 100 हून अधिक गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले आहे. गुंड विनोद मटकरचे केलेले एन्काऊंटर विशेष गाजले होते. परवेझ सिद्दीकी, रफिक डबावाला, सादिक कालिया या कुख्यात गुंडांचाही शर्मांनी खात्मा केला होता. लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचाही शर्मांनी खात्मा केला होता. मात्र, 2008 मध्ये शर्मा यांना लखनभय्या बनावट चकमकप्रकरणी अटक करण्यात आली. नंतर त्यांना पोलीस दलातून निलंबीत करण्यात आले होते. 2013 मध्ये मुंबई हायकोर्टाने शर्मांची मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक आरोपांमधूनही शर्मांची मुक्तता करण्यात आली आहे.

VIDEO :...जर सेनासोबत नसेल तर भाजपला इतक्या जागा, आठवलेंचं भाकीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 09:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...