'आम्हालाही त्यांच्या भाषेत उत्तरं देता येतात पण...', फडणवीसांचा सेनेवर हल्लाबोल

'आम्हालाही त्यांच्या भाषेत उत्तरं देता येतात पण...', फडणवीसांचा सेनेवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मित्रपक्ष शिवसेनेवर जहरी टीका केली.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर : मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता-सुटता नसताना आता देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मित्रपक्ष शिवसेनेवर जहरी टीका केली. आज राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी भाजपच सरकार तयार करणार असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळं शिवसेना आणि भाजप यांच्यातील तिढा वाढत असल्याचे चिन्ह दिसत आहे. तसेच, पाच वर्ष वर्ष जनतेची सेवा केली त्याचा आनंद आहे, असे मत व्यक्त करत उध्दव ठाकरे किंवा शिवसेना यांचे नाव न घेता मित्रपक्षाचे आभार मानले. मित्रपक्षांचे आभार मानत असताना फडणवीस यांनी, ‘ते सोबत होती की नाही, तुम्हाला माहिती आहे’, असे म्हणत शिवसेनेचा टोला लगावला. तसेच, अडीच-अडीच वर्षांचे काहीच बोलणे झाले नाही असे मत व्यक्त केले.

वाचा-VIDEO : अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबद्दल फडणवीस यांचा मोठा खुलासा, सेनेवर

मुख्यमंत्र्यांनी यावेळी, महायुतीला संपूर्ण बहुमत लोकांनी दिले. त्याचबरोबर 105 जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. या निवडणुकीतला स्ट्राईक रेट हा 70 टक्के पेक्षा जास्त आहे. आमच्या कामाची पावती लोकांनी आम्हाला दिली. सुदैवानं ज्या दिवशी निकाल आले, तेव्हा अपेक्षेपेक्षा कमी जागा आल्या.

एकीकडे निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षांनी दावा न केल्यामुळं मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्तास्थापनेसाठीची मुदत उद्या, 9 नोव्हेंबरला संपतेय. त्यामुळेच सरकार स्थापन करण्याच्या घटनांना वेग आला आहे. एकीकडे राऊत आणि पवार यांची भेट सुरू असताना दुसरीकडे उध्दव ठाकरेही आमदारांशी चर्चा करणार आहेत.

वाचा-LIVE : शिवसेनेनं पहिला धक्का दिला; अडीच वर्षांचा शब्द दिलाच नव्हता - फडणवीस

शिवसेनेवर मुख्यमंत्र्यांची जहरी टीका

पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी, "उद्धवजींच्या आजुबाजुच्यांची भाषा अयोग्य. त्यानं मीडीयात जागा मिळते पण सरकार होत नाही. बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर आमच्या नेत्यांनी कधीचं केली नाही. शिवसेनेची मोदींवर खालच्या दर्जाची टीका. झालेली टीका आमच्या मनाला लागली आहे. मी उद्धव यांना अनेकदा फोन केले पण त्यांनी ते उचलले नाही आम्ही चर्चेची दारं बंद केली नव्हती आमच्याशी चर्चा करायला वेळ नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करायला वेळ होता. उद्धव ठाकरे यांचं सरकार बनवण्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत", असं धक्कादायक विधान केलं. तसेच, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं की आम्हाला सरकार बनवण्याचे सर्व दरवाजे उघडे आहे याचा आम्हाला धक्का बसला असेही फडणवीस म्हणाले.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार; पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 8, 2019 05:20 PM IST

ताज्या बातम्या