काँग्रेस उमेदवारांची पाहिली यादी झाली लीक, हे दिग्गज उतरणार आखाड्यात!

काँग्रेस उमेदवारांची पाहिली यादी झाली लीक, हे दिग्गज उतरणार आखाड्यात!

पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी काँग्रस ही यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी प्रत्येक जागा महत्त्वाची असून युतीच्या उमेदवारांचा अंदाज घेऊन काँग्रेसने आपले उमेदवार निश्चित केले आहेत.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 27 सप्टेंबर : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी बैठक झाल्यानंतर आता काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीतली नावं बाहेर आली आहेत. यात काही मोजके अपवाद वगळता जवळपास सर्वच उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. दिल्लीत सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नावांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला राज्यातले काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. बैठकीनंतर माहिती देताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्ही 45 जागांवर चर्चा केली, त्यापैकी आज 35 जागांचा निर्णय झाला आहे. यापूर्वी 50 जागांचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे आता एकूण 85 जागांवरचे उमेदवार निश्चित झाले आहेत.

या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं, उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

थोरात पुढे म्हणाले, आम्हाला आमच्या मित्र पक्षांनाही काही जागा द्याव्या लागतील परंतु काँग्रेस जवळपास 150 जागा लढवू शकेल अशी सद्या  स्थिती आहे अशी माहितीही त्यांनी दिली होती.

माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भोकरमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. 2014 च्या निवडणुकीत तिथे चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी मिळाली होती.

माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांचं नाव या पहिल्या यादीत नाहीये. चव्हाण यांना साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उतरविलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

शरद पवारांच्या खेळीनंतर बदललं राजकीय समीकरण, भाजपसमोर नवं आव्हान

ही आहे काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी

बाळासाहेब थोरात (संगमनेर )

अशोक चव्हाण (भोकर)

विजय वडेट्टीवार (ब्रम्हपूरी)

डी. पी. सावंत (नांदेड)

वसंत चव्हाण (नायगाव, नांदेड)

अमीन पटेल (मुंबादेवी)

वर्षा गायकवाड (धारावी)

भाई जगताप (कुलाबा)

नसीम खान (चांदीवली)

यशोमती ठाकूर (तिवसा)

के. सी. पडवी (अक्कलकुवा)

संग्राम थोपटे ( भोर )

संजय जगताप (सासवड)

वीरेंद्र जगताप (धामनगाव)

सुनील केदार (सावनेर)

अमित देशमुख (लातूर)

बसवराज पाटील (औसा)

विश्वजित कदम (भिलवडी)

प्रणिती शिंदे (मध्य-सोलापूर)

पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी काँग्रस ही यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी प्रत्येक जागा महत्त्वाची असून युतीच्या उमेदवारांचा अंदाज घेऊन काँग्रेसने आपले उमेदवार निश्चित केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 05:29 PM IST

ताज्या बातम्या