काँग्रेसला हवाय उर्मिला मातोंडकर यांचा 'हात', या कामासाठी घातलं साकडं

काँग्रेसला हवाय उर्मिला मातोंडकर यांचा 'हात', या कामासाठी घातलं साकडं

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची आठवण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 6 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची आठवण झाली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करावा, असे साकडं काँग्रेसने घातलं आहे. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी यासंदर्भात उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा देखील केल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात उर्मिला मातोंडकर येत्या दोन दिवसांत आपला निर्णय कळवणार आहेत. दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती.

गटबाजीला कंटाळून दिली सोडचिठ्ठी..

लोकसभा निवडणुकीच्या वेळी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला यांनी भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याशी लढत दिली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. नंतर मात्र अवघ्या काही महिन्यातच पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मुंबई शहर काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळाले नाही, असा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला होता.

मी काँग्रेसच्या विचारधारेला मानते..

उर्मिला मातोंडकर यांनी 27 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. 'मी काँग्रेसच्या विचारधारेला मानते, माझे वडीलही काँग्रेस विचारधारेला मानतात, असे उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत सहकार्य केले नसल्याबाबत वरिष्ठांना पत्र लिहिले होते. मात्र, काँग्रेसने त्यांच्या या पत्राला अपेक्षित असा प्रतिसाद दिला नाही. त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पदे दिली जात असल्याने उर्मिला मातोंडकर नाराज झाल्या होत्या. अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता.

VIDEO:माकडाने पाडला पैशांचा पाऊस, पैसे घेण्यासाठी लोकांची गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 03:18 PM IST

ताज्या बातम्या