कॉंग्रेसच्या उमेदवांराची पहिली यादी जाहीर, जुन्याच चेहऱ्यांचे प्राबल्य, येथे पाहा यादी

नव्या चेहऱ्यांना कमी संधी देण्यात आली असून या यादीवर जुन्या चेहऱ्यांचे प्राबल्य दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 07:36 PM IST

कॉंग्रेसच्या उमेदवांराची पहिली यादी जाहीर, जुन्याच चेहऱ्यांचे प्राबल्य, येथे पाहा यादी

मुंबई,29 सप्टेंबर: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने घटस्थापनेच्या मुहुर्तावर 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कॉंग्रेसचे सचिव मुकुल वासनिक यांनी ही यादी जाहीर केली आहे. या यादीवर जुन्या चेहऱ्यांचे प्राबल्य दिसत आहे. नव्या चेहऱ्यांना कमी संधी देण्यात आली आहे. कॉग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोकराव शंकरराव चव्हाण यांना भोकर येथून, लातूरमधून अमित विलासराव देशमुख, निलंग्यातून अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर, सोलापूर (मध्य) मधून प्रणिती सुशिलकुमार शिंदे, डॉ.विश्वजीत पतंगराव कदम यांना पळुस-कडेगाव येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

दुसरीकडे, कॉंग्रेसने जाहीर केलेल्या यादीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारासह महाराष्ट्रातले कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळु धानोरकर यांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांना वरोरा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे याच वरोरा मतदारसंघाचे बाळु धानोरकर हे शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. आता त्यांनी दिल्लीतले वजन वापरुन अनेक जण या जागेसाठी दावेदारी करत असताना आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवून दिली आहे.

अशी आहेत उमेदवार

अक्कलकुवा - के.सी पडवी

शहादा - पदमाकर विजयसिंग वालवी

Loading...

नवापूर - शिरिष नाईक

रावेर - शिरिष चौधरी

बुलडाणा - हर्षवर्धन सकपाळ

मेहकर- अनंत वानखेडे

रिसोड - अमित जनक

धामनगाव - विरेंद्र जगताप

तिवसा - यशोमती ठाकूर

आर्वी - अमर शरद काळे

देवळी- रंजीत प्रताप कांबळे

सावनेर- सुनील छत्रपाल केदार

नागपूर (उत्तर)- डॉ. नितीन राऊत

ब्रह्मपुरी- विजय नामदेवराव वजेट्टीवार

चिमुर- सतीश मनोहर वर्जुराकर

वरोरा- प्रतिभा सुरेश धानोरकर

यवतमाळ- अनिल बाळासाहेब मांग्रुळकर

भोकर- अशोकराव शंकरराव चव्हाण

नांदेड (उत्तर)- डी.पी. सावंत

नायगाव- वसंतराव बळवंतराव चव्हाण

देगलूर- रावसाहेब जयवंत अनंतपुरकर

काळमनुरी- संतोष कौतिका तर्फे

पाथरी- सुरेश अंबादास वारपुडकर

फुलंब्री- डॉ. कल्याण वैजंथराव काळे

मालेगाव (मध्य)- शैख असिफ शैख राशिद

अंबरनाथ- रोहित चंद्रकात साळवे

मिरा भाईंदर- सय्यद मुझफ्फर हुसेन

भांडूप (पश्चिम)- सुरेश हरिशचंद्र कोपरकर

अंधेरी (पश्चिम)- अशोकभाऊ जाधव

चांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खान

चेंबूर- चंद्रकात दामोदर हंदोरे

वांद्रे (पूर्व)- जिशान जियाउद्दीन सिध्दीकी

धारावी- वर्षा एकनाथ गायकवाड

सायन कोळीवाडा- गणेश कुमार यादव

मुंबादेवी- अमिन अमीराली पटेल

कोलाबा- अशोक अर्जुनराव जगताप

महाड- माणिक मोतिराम जगताप

पुरंदर- संजय चंद्रकांत जगताप

भोर- संग्राम अनंतराव तोपते

पुणे- रमेश अनंतराव बागवे

संगमनेर- विजय बाळासाहेब थोरात

लातुर (शहर)- अमित विलासराव देशमुख

निलंगा- अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर

औसा- बासवराज माधवराव पाटील

तुळजापूर- मधुकरराव देवराम चव्हाण

सोलापूर शहर (मध्य)- प्रणिती सुशील कुमार शिंदे

सोलापूर (दक्षिण)- मौलबी बाशुमिया सयीद

कोल्हापूर (दक्षिण)- ऋतुराज संजय पाटील

कारवीर- पी.एन.पाटील सादोळीकर

पळुस-कडेगाव- डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

88 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

- अधिसूचना - 27 सप्टेंबर.

- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर.

- उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर

- उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवणार

- 2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Congress
First Published: Sep 29, 2019 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...