Elec-widget

मुख्यमंत्री म्हणाले, युतीचं लवकरच कळेल.. नारायण राणेंचा 'निर्णय' योग्य वेळी!

मुख्यमंत्री म्हणाले, युतीचं लवकरच कळेल.. नारायण राणेंचा 'निर्णय' योग्य वेळी!

निवडणूक येतील,जातील पण देशाचे विषय मांडावेच लागतील. युतीची चिंता जशी शिवसेनेला आहे तशीच आम्हालाही आहे.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर: निवडणूक येतील,जातील पण देशाचे विषय मांडावेच लागतील. युतीची चिंता जशी शिवसेनेला आहे तशीच आम्हालाही आहे. युतीचं लवकर कळेल. आम्ही निर्णय घोषित करू. तसेच नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाचा निर्णयही योग्य वेळी घेऊ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

अर्थमंत्री आणि पंतप्रधानांचे मानले आभार...

कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि मोदी सरकारचे आभार मानले आहेत. उद्योग जगतासाठी घेण्यात आलेला हा सर्वात मोठा निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले. याचा नक्कीच देशातील कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. 3 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बजेटमध्ये सादर केले ते फायद्याचे आणि आता जे निर्णय घेतलेत ते अधिक फायद्याचे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नारायण राणेंना पुन्हा धक्का, आजचा भाजप प्रवेश रद्द!

काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांची भाजपमध्ये प्रवेशासाठी रांग लागलीय. आत्तापर्यंत पक्षप्रवेशाचे तीन मोठे कार्यक्रम झालेत. पण माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या भाजप प्रवेशावर मात्र 'तारीख रे तारीख' सुरू आहे. आज नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना आता पुन्हा त्यांचा प्रवेश लांबणीवर गेला आहे. भाजप प्रवेशाबाबत राणे वारंवार उल्लेख करत असले तरी भाजपकडून मात्र स्पष्टपणे काहीही सांगितलं जात नाही. त्यामुळे नेमकं कोण प्रवेश घेणार आहे हे अजुनही गुलदस्त्यात आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणाही झाली त्यामुळे त्याआधी जास्तीत जास्त प्रवेश करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत आज राणेंचा प्रवेश होण्याची चर्चा होती. मात्र, कोणताही प्रवेश होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या प्रवेशाच्या तारखेबद्दल भाजपमधून अद्याप कोणी जाहीर भाष्य केलं नसल्याने संभ्रम कायम आहे. मात्र राणे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या भाजपा प्रवेशाचा पुनरुच्चार केला आहे. येत्या आठ दिवसात आपला भाजपा प्रवेश होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होत.

'भाजप-शिवसेना युती होईल की नाही याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. माझं बोलणं भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी झालेलं आहे. मला भाजपचे नेते पक्षात प्रवेश देणार आहेत,' असं म्हणत नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.

दरम्यान, नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा सावंतवाडीत मेळावा घेऊन भाजपा प्रवेशाची कल्पना दिली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आठ दिवसात आपला प्रवेश होणार असल्याचं म्हटलं होतं.

VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...