पक्षाने दिली नाही उमेदवारी, या राजकीय नेत्याच्या घरात सापडलं घबाड

सोलापूर जिल्ह्यात जाणार होती ही रक्कम...

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 08:04 PM IST

पक्षाने दिली नाही उमेदवारी, या राजकीय नेत्याच्या घरात सापडलं घबाड

ठाणे,18 ऑक्टोबर:ठाण्यातील एका राजकीय नेत्याच्या घरात कोट्यवधींचे घबाड सापडले आहे. ठाणे-घोडबंदर रोडवरील पुष्पांजली रेसिडन्समधील 301 नंबर फ्लॅटमध्ये ही रोकड सापडली आहे. ठाणे क्राईम ब्रॅंच युनिट 1 ने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी निवडणूक अधिकारी चौकशी करत आहेत. मात्र, हा राजकीय नेता कोण, तो कोणत्या पक्षाचा आहे, याबाबत अद्याप समजू शकले.

सोलापूरला जाणार होती रक्कम..

मिळालेली माहिती अशी की, राजू खरे नामक व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एकूण 53 लाख 46 हजार रुपये रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम सोलापूर जिल्ह्यात जाणार होती. मात्र, पक्षाने त्या नेत्याला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पैसे दुसऱ्या कामकरता सोलापूरला नेले जात होते. सोलापूरमधील तो राजकीय नेता कोण आहे, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

सुप्रिया सुळेंच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती..

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरची निवडणूक विभागाच्या फिरत्या तपासणी पथकाकडून झाडाझडती करण्यात आली. तपासनी केल्यानंतर महालक्ष्मी रेस कोर्सवरून सुप्रिया सुळे हेलिकॉप्टरने रवाना झाल्या.

Loading...

मुंबईतून 15.5 कोटींची रक्कम जप्त...

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून मुंबईतून सुमारे 15.5 कोटी रक्कम प्राप्तीकर विभागाने जप्त केले आहेत. निवडणुकीत मतदारांन आकर्षित करण्यासाठी होणाऱ्या पैशांच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी प्राप्तीकर विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे.

वंचित आघाडीच्या कार्यालयात सापडली होती एवढी रक्कम...

दरम्यान गेल्या आठवड्यात प्राप्तीकर विभागाने वंचित बहुजन आघाडीचे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अबुल हसन खान यांच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. अबुल हसन खान यांच्या साकीनाका कार्यालयात 1 हजार 100 रुपये आढळून आले होते. त्यानंतर प्राप्तीकर विभागाने दिवसभर आमच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली, असा आरोप वंचित आघाडीकडून करण्यात आला होता. सत्ताधारी भाजप-शिवसेना सूडबुद्धीतून अशी कारवाई करत आहे, असंही वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

माझ्या भावाला का मारलं? राज ठाकरेंच्या सभेत राडा, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...