निकालाआधीच भाजपची जल्लोषाची तयारी, 5000 लाडूंची ऑर्डर!

निकालाआधीच भाजपची जल्लोषाची तयारी, 5000 लाडूंची ऑर्डर!

भाजपने मिठाई, फटाके आणि ढोल ताशा यांची जय्यत तयारी केलीय. दिवाळी आधीच आतषबाजी होणार

  • Share this:

विवेक कुलकर्णी मुंबई 23 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता फक्त काही तास राहिलेत. अवघ्या काही तासांमध्ये राज्यातलं चित्र स्पष्ट होणार आहे. सर्वच एक्झिट पोल्समध्ये महायुतीला मोठं यश मिळणार असं सांगितलेलं आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. भाजप-शिवसेना 200 पार करणार असं जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सनी सांगितलंय. त्यामुळे भाजपने 24 तारखेच्या जल्लोषासाठी तयारी सुरू केलीय. मिठाई, फटाके आणि ढोल ताशांची सोय करण्यात आलीय. नरिमन पॉईंट इथं असलेल्या भाजपच्या मुख्यालयाबाहेर व्यासपीठही उभारण्यात येणार असून दिग्गज नेते इथे उपस्थित राहणार आहेत.

मतमोजणीच्या तोंडावर नवा सर्व्हे, वंचित आणि मनसे उघणार खातं!

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सलग 11 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहण्याची संधी कुणाही नेत्याला मिळाली नाही. शरद पवार यांनी चार वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवलं मात्र त्यांना एकदाही सलग पाच वर्ष पूर्ण करता आली नाहीत. तो मान आता देवेंद्र फडणवीसांना मिळणार असून सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येणं ही मोठी राजकीय जमेची बाजू असणार आहे.

निकाल लागल्यानंतर भाजप मोठा जल्लोष करणार असून दिवाळीआधीच भाजप आतषबाजी करणार आहे.

ST च्या 1 लाख कर्मचाऱ्यांना मिळाली दिवाळीची ही खास भेट

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (गुरुवारी)सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पहिला कल हाती येईल. त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे कळण्यास सुरुवात होईल. मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 च्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे.

सावधान...मतमोजणीनंतर महाराष्ट्रात येणार चक्रीवादळ!

निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षातील उमेदवारांनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराच्या मैदाना अनेक आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. त्यानंतर 21 ऑक्टोबर मतदान झाल्यानंतर सर्व उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. आता उद्या मतमोजणी असलेल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढल्याचं चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading