महायुतीच्या विरोधातील बंडखोरी करणाऱ्या नेत्यांनी भाजपने दाखवला घराचा रस्ता

महायुतीच्या विरोधातील बंडखोरी करणाऱ्या नेत्यांनी भाजपने दाखवला घराचा रस्ता

तिकीट न मिळालेल्या युतीमधील काही नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहेत.

  • Share this:

विवेक कुलकर्णी,(प्रतिनिधी)

मुंबई,10 ऑक्टोबर: महायुतीच्या विरोधात जाऊन बंडाचे निशाण फडकावणाऱ्या नेत्यांना आता भाजपने घराचा रस्ता दाखवला आहे. अर्थात त्यांनी बडतर्फ करण्यात आले आहे.

भाजप-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या भाजपच्या मीरा भाईंदर गीता जैन यांच्यासह चरण वाघमारे (तुमसर), बाळासाहेब ओव्हाळ (पिंपरी चिंचवड), दिलीप देशमुख (अहमदपूर,जि.लातूर), यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी राजीनामा दिल्याचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

बंडखोरांना दिला होता इशारा..

तिकीट न मिळालेल्या युतीमधील काही नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहेत. पुढच्या दोन दिवसांत बंडखोरांना अर्ज मागे घ्यायला लावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तरीही त्यांनी बंडखोरी केली, त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तिकिटं कापली नाहीत तर जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. काही कार्यकर्ते विधानसभेच्या बाहेर राहून पक्षाचे काम करतील. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारासह 28 नेत्यांचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात महायुतीत फूट पडली आहे. शिवसेना बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 18 नगरसेवक आणि उल्हासनगरमधील 10 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. आमच्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये, अशी राजीनामा दिलेल्या नगरसेवकाचे म्हणणे आहे.

दरम्यान, कल्याण पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण पूर्व मतदार संघ भाजपला सोडल्याने शिवसेनेचे स्थानिक नगरसेवकांसह पदाधिकारी नाराज झाले होते. या मतदार संघातून उल्हासनगर महापालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते धनंजय बोडारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

2014 मध्ये एकला चलो रे..

शिवसेनेने 2014 च्या निवडणुकीत एकला चलो रे..चा भूमिका स्विकारली होती. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले गणपण गायकवाड यांनी 777 मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. या निवडणुकीत मात्र गणपत गायकवाड यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. यामुळे शिवसेनेचे नगरसेवकांसह पदाधिकारी नाराज झाले आहेत

VIDEO:अमित शहांच्या भाषणादरम्यान 'सीएम सीएम' घोषणाबद्दल पंकजा मुंडे म्हणाल्या....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...