अखेर भाजपच ठरला मोठा भाऊ.. असा असेल शिवसेना-भाजपचा फार्म्युला

अखेर भाजपच ठरला मोठा भाऊ.. असा असेल शिवसेना-भाजपचा फार्म्युला

शिवसेना-भाजपचं जागाचं गणित जुळलं असून युतीची 29 सप्टेंबरला घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे,(प्रतिनिधी)

मुंबई, 25 सप्टेंबर: शिवसेना-भाजपचं जागाचं गणित जुळलं असून युतीची 29 सप्टेंबरला अर्थात घटस्थापनेला घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार आहेत. त्यामुळे जागावाटपात भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. उर्वरित जागा मित्रपक्षासाठी सोडण्यात येणार आहे. शिवसेना सोडून इतर मित्रपक्ष भाजपच्या 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे बोलवे जात आहे.

या पाच जागांवर अडलं होतं युती'चं घोडं

भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून जागावाटपाचा तिढा सुटण्यात जमा झाला आहे. शेवटच्या 11 जगांचा प्रश्न काही प्रमाणात सुटून तो आता फक्त 5 जागांच्या तडजोडीवर आला आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत 5 जागांचाही तिढा सोडवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती युती अभेद्य राहाणारच आहे, अशा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

या पाच जागांवर अडलं होतं घोडं

1) औसा, लातूर जिल्हा

2) वडाळा, मुंबई

3) एरोली, ठाणे

4) बेलापूर, ठाणे

5) उल्हासनगर, ठाणे

आधी होता 12 जागांवर तिढा

मागील विधानसभा निवडणुकीत गेल्या 25 वर्षांपासून अभेद्य असलेली शिवसेना-भाजपची युती तुटली होती. त्यानंतर राज्यात भाजपने आपली वाढलेली ताकद दाखवून देत 122 जागांपर्यंत मजल मारली. यंदा मात्र दोन्ही पक्षांनी एकत्रिपणे विधानसभा निवडणुकांचा सामना करत आहेत. मात्र काही जागांवरून युतीचं घोड अडलं आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल तसंच विदर्भातील देवळी, रिसोड, गोंदिया आणि मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर आणि ठाण्यातील उल्हासनगर या जागांचा समावेश आहे.

दरम्यान, जागावाटपात 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम होता. भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. तरीही शिवसेनेला कमी जागा मान्य नव्हत्या. बदलती राजकीय परिस्थिती इतर पक्षांमधल्या नेत्यांचं भाजपमध्ये येणे. लोकसभेनंतर वाढलेली ताकद यामुळे जास्त जागा मिळाव्यात, अशा मागणीवर भाजप ठाम होता. अखेर भाजप मोठा भाऊ असल्याचे शिवसेनेला मान्य करावे, लागले आहे. भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार आहेत. उर्वरित जागा मित्रपक्षासाठी सोडण्यात येणार आहे.

VIDEO:उदयनराजेंही तुमच्या मिशीला घाबरतात, मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 08:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading