भाजपच्या बंडखोर महिला नेत्याने मागितला शिवसेनेला पाठींबा, सरनाईकांचा गौप्यस्फोट

बाळासाहेब ठाकरे कलादालनावरून झालेल्या राड्याबाबत दोन्ही पक्षात झाले मनोमिलन...

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2019 04:23 PM IST

भाजपच्या बंडखोर महिला नेत्याने मागितला शिवसेनेला पाठींबा, सरनाईकांचा गौप्यस्फोट

विजय देसाई,(प्रतिनिधी)

मीरा भाईंदर,12 ऑक्टोबर:आमदार नरेंद्र मेहता आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रचारासाठी सेव्हन इलेवनच्या पटांगणावर दोन्ही उमेदवाराच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन केलं होतं. यासाबेत बाळासाहेब ठाकरे कलादालनावरून झालेल्या राड्याबाबत दोन्ही पक्षाचा मनोमिलन झाल्याचे जाहीर केलं. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, राजन विचारे, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा, गणेश नाईक, संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

आमचं जमलंय, कलादालनावरून झालेला वाद मिटला आहे. भाजपच्या बंडखोर उमेदवार गीता जैन यांनी शिवसेनेकडे पाठींबा मागितल्याचा गौप्यस्फोट प्रताप सरनाईक यांनी केला.

भाईंदरच्या जैन मंदिरात आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रचाराचे पोस्टर झळकले होते आणि जैन मुनींनी मेहता यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्याचा व्हिडियो व्हायरल झाला होता. पोस्टरप्रकरणी आचारसंहिता भंग झाल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यांनी माझा प्रतिस्पर्धी कोणी नसून मीच पुढे आणि सर्व मागून येत असल्याचा दावा आमदार नरेंद्र मेहता यांनी केला.

Loading...

भाजपने या नेत्यांनी दाखवला घराचा रस्ता

महायुतीच्या विरोधात जाऊन बंडाचे निशाण फडकावणाऱ्या नेत्यांना आता भाजपने घराचा रस्ता दाखवला आहे. अर्थात त्यांनी बडतर्फ करण्यात आले आहे. भाजप-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या भाजपच्या मीरा भाईंदर गीता जैन यांच्यासह चरण वाघमारे (तुमसर), बाळासाहेब ओव्हाळ (पिंपरी चिंचवड), दिलीप देशमुख (अहमदपूर,जि.लातूर), यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी राजीनामा दिल्याचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

बंडखोरांना दिला होता इशारा..

तिकीट न मिळालेल्या युतीमधील काही नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहेत. पुढच्या दोन दिवसांत बंडखोरांना अर्ज मागे घ्यायला लावणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तरीही त्यांनी बंडखोरी केली, त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तिकिटं कापली नाहीत तर जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. काही कार्यकर्ते विधानसभेच्या बाहेर राहून पक्षाचे काम करतील. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारासह 28 नेत्यांचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात महायुतीत फूट पडली आहे. शिवसेना बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 18 नगरसेवक आणि उल्हासनगरमधील 10 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. आमच्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये, अशी राजीनामा दिलेल्या नगरसेवकाचे म्हणणे आहे.

दरम्यान, कल्याण पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण पूर्व मतदार संघ भाजपला सोडल्याने शिवसेनेचे स्थानिक नगरसेवकांसह पदाधिकारी नाराज झाले होते. या मतदार संघातून उल्हासनगर महापालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते धनंजय बोडारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

'370चं भांडवल करणारे 371 वर गप्प का?' शरद पवारांचा अमित शाहांना सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 04:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...