भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा 'प्रताप', सभेत म्हणाले, तुम्ही मत देणार की मुलगी?

भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा 'प्रताप', सभेत म्हणाले, तुम्ही मत देणार की मुलगी?

उरणमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी हे रिंगणात उतरले आहेत. मात्र, महेश बालदी आता चक्क मतदारांना मुलगी मागत आहेत.

  • Share this:

रायगड,12 ऑक्टोबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या नावावर विधानसभा निवडणुकीमध्ये मत मागणारे रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवाराचा 'प्रताप' समोर आला आहे. उरणमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी हे रिंगणात उतरले आहेत. मात्र, महेश बालदी आता चक्क मतदारांना मुलगी मागत आहेत. उरण विधानसभेमध्ये महेश बालदी यांनी लोकांना सांगितले की, तुम्ही मला मत देणार की, तुमची मुलगी देणार?

भाजपाचे बंडखोर उमेदवार महेश बालदी हे विद्यमान आमदार व शिवसेना उमेदवार यांचाविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. बालदी यांचा मते मागण्याचा व मुली मागण्याच्या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. आगरी, कोळी, कराडी मराठी समाजाने पोलिसांत बालदी विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. रायगडमधील अनेक संस्था आणि सर्व पक्षीय समिती, महिला आघाडीने महेश बालदी यांच्या वक्तव्याची निषेध केला आहे. मतदारसंघात अनेक ठिकाणी महेश बालदी यांच्याविरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.

अपक्ष महेश बालदी यांना भाजपचा पाठिंबा

दरम्यान, भाजपचे जिल्हा चिटणीस महेश बालदी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. शिवसेना व भाजपमध्ये उरणमधील जागेसाठी रस्सीखेच सुरू होती. अखेरीस शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांना ही जागा युतीमध्ये सोडण्यात आली. असे असले तरी भाजपची ताकद उरण विधानसभा मतदारसंघात वाढलेली असून महेश बालदी यांनी शेकडो कोटी रुपयांची विकास कामे सरकारच्या माध्यमातून केली असल्याने भाजपचाच उमेदवार निवडून येणार असल्याने बंडखोरी करीत आपला अर्जही दाखल केला आहे. यामुळे युतीच्या दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

'जिथे तलवार चालली त्या गडांवर छमछम वाजणार का?' पवारांचा भाजपला सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 02:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading