भाजपला 50-50 फॉर्म्युला तुर्तास अमान्य.. शिवसेनेला युतीसाठी दिली ही नवी 'ऑफर'

भाजपला 50-50 फॉर्म्युला तुर्तास अमान्य.. शिवसेनेला युतीसाठी दिली ही नवी 'ऑफर'

लोकसभा निवडणुकीत 'कमळ' फुलल्यानंतर, अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर भाजपचा भाजप नेत्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर: लोकसभा निवडणुकीत 'कमळ' फुलल्यानंतर, अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर भाजप नेत्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मात्र, युतीसाठी शिवसेनेचा 50-50 फॉर्म्युला भाजपने तुर्तास अमान्य केला आहे. सध्या महाराष्ट्रात भाजपचे 122 आमदार आहेत. त्यामुळे ही मागणी भाजपला मान्य नाही. त्यामुळे शिवसेनेला युतीसाठी भाजपने नवी ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत 135 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले असताना भाजपने शिवसेनेला 120 जागांची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे भाजपने स्वत: 156 जागा लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. उर्वरीत 12 जागा मित्र पक्षांसाठी सोडणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. आता यावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपने विधानसभा स्वबळावरच लढवावी..

दुसरीकडे, भाजपने विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवाव्यात, अशी मागणी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची सध्या भाजपमध्ये 'मेगाभरती' सुरू आहे. त्यामुळे भाजपला त्यांच्या जागांची अदलाबदल हवी आहे. त्यामुळेच स्वबळावर लढण्याचा आग्रह केला जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात स्वबळावर लढून यश मिळवण्याचा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना करावे लागले होते.

SPECIAL REPORT: राजे मंडळींनी राष्ट्रवादीची साथ सोडली; शरद पवार एकटे पडले?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 11:21 AM IST

ताज्या बातम्या