आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला राज ठाकरेंची भेट, चर्चेला उधाण

आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला राज ठाकरेंची भेट, चर्चेला उधाण

गणरायाचे दर्शन घेतानाचे राज ठाकरे यांचे फोटो आशिष शेलार यांनी ट्वीट केले आहेत. परंतु या फोटोंमध्ये शेलार कुठेही दिसत नाही आहेत.

  • Share this:

मुंबई, 3 सप्टेंबर: राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास मनसे अध्सक्ष राज ठाकरे यांनी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गणरायाचे दर्शन घेतानाचे राज ठाकरे यांचे फोटो आशिष शेलार यांनी ट्वीट केले आहेत. परंतु या फोटोंमध्ये शेलार कुठेही दिसत नाही आहेत.

काय म्हणाले आशिष शेलार?

राज ठाकरे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट दिले तेव्हा आपण तिथे उपस्थित नव्हतो, ते आले दर्शन घेतले आणि निघून गेले, असे आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि शेलार यांचे राजकीय संबंध कायम चर्चेचा विषय ठरत आला आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा ओढा आघाडीकडे होता. ईडी चौकशीनंतर मात्र राज ठाकरे स्वत: शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेटीला गेले. विशेष म्हणजे, कालच (सोमवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास भेट दिली होती.

'लाव रे तो व्हिडिओ'बद्दल काय म्हणाले होते आशिष शेलार...

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा करून भाजपविरोधात सभा घेतल्या होत्या. जाहीर सभांमध्ये व्हिडिओ दाखवून भाजपवर घणाघाती आरोप केले होते. या आरोपांवर भाजपने राज यांना त्यांच्याच स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिले होते. बघाच तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी केलेले सर्व आरोप भाजपने फेटाळून लावले. राज ठाकरेंच्या 32 प्रकरणांचा आढावा घेण्याची आमची तयारी पण वेळेअभावी १९ प्रकरणे दाखवले, असे आशिष शेलार यांनी एका सभेत म्हटले होते.

राज ठाकरे यापूर्वी राहुल गांधी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल काय बोललो होते. त्यांच्यावर कशी टीका केली होती. ते राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ दाखवले. भाजपचे खोटे व्हिडिओ दाखवून राज ठाकरे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे, अशी टीकाही शेलार यांनी केली होती.

VIDEO: नाना पाटेकर यांनी 'या' कारणासाठी केलं मुनगंटीवार यांचं कौतुक

First Published: Sep 3, 2019 04:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading