महायुतीत फूट, निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारासह 28 नेत्यांचा राजीनामा

महायुतीत फूट, निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारासह 28 नेत्यांचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात महायुतीत फूट पडली आहे.

  • Share this:

मुंबई,9 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात महायुतीत फूट पडली आहे. शिवसेना बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 18 नगरसेवक आणि उल्हासनगरमधील 10 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. आमच्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये, अशी राजीनामा दिलेल्या नगरसेवकाचे म्हणणे आहे.

दरम्यान, कल्याण पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण पूर्व मतदार संघ भाजपला सोडल्याने शिवसेनेचे स्थानिक नगरसेवकांसह पदाधिकारी नाराज झाले होते. या मतदार संघातून उल्हासनगर महापालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते धनंजय बोडारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

2014 मध्ये एकला चलो रे..

शिवसेनेने 2014 च्या निवडणुकीत एकला चलो रे..चा भूमिका स्विकारली होती. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले गणपण गायकवाड यांनी 777 मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. या निवडणुकीत मात्र गणपत गायकवाड यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. यामुळे शिवसेनेचे नगरसेवकांसह पदाधिकारी नाराज झाले आहेत.

जे सुडाचं राजकारण करतील त्यांना चिरडून टाकू- उद्धव ठाकरे

Loading...

'विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा झाला. त्यासाठी मुंबईत शिवाजी पार्कवर जय्यत तयारीही करण्यात आली होती. राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर जमले होते. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. जोपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी यांच धोरण बदलत नाही तोपर्यंत तेच माझ्य टार्गेटवर राहतील असंही ते म्हणाले. भाजपला पाठिंबा देण्याशीवाय दुसरा काय पर्याय होता. 370 कलमाचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला समर्थन द्यायचं काय असा सवालही त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजा करायची असते, माझी शस्त्र ही माझ्या समोर महाराष्ट्रभर पसरलेली आहेत आणि तुमच्या सगळ्यांचं पूजन करून मी याच महिन्यात असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवायला निघालो आहे. आजही आम्ही ठाम आहोत, विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा ही आजही शिवसेनेची मागणी आहे असंही ते म्हणाले.

VIDEO : समोर पैलवानच दिसत नाही, मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...