उमेदवारीवरून नवी मुंबईत नवा ट्विस्ट, वडिलांसाठी संदीप नाईकांनी घेतला मोठा निर्णय

उमेदवारीवरून नवी मुंबईत नवा ट्विस्ट, वडिलांसाठी संदीप नाईकांनी घेतला मोठा निर्णय

ऐरोली मतदार संघातून भाजपने संदीप नाईक यांना उमेदवारी दिली होती पण संदीप नाईकांऐवजी गणेश नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

  • Share this:

 विनय म्हात्रे, प्रतिनिधी

नवी मुंबई, 02 ऑक्टोबर : नवी मुंबईच्या राजकारणात एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. गणेश नाईक हे ऐरोलीमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुत्र संदीप नाईकांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. भाजपने गणेश नाईकांना तिकीट नाकारलं होतं. त्यावर वडिलांसाठी मुलाने उमेदवारीचा त्याग केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

ऐरोली मतदार संघातून भाजपने संदीप नाईक यांना उमेदवारी दिली होती पण संदीप नाईकांऐवजी गणेश नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आज दुपारी 3 वाजता या निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपने पहिल्या उमेदवार यादीत डावलल्यानंतर नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांनी आपल्या समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. त्यामुळे गणेश नाईक भाजप सोडण्याबाबत विचार करत आहेत का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र आता नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनी याबाबत खुलासा केला आहे.

'नाईक कुटुंब भाजपमध्येच आहे. आम्ही कुठल्याही पक्षात जाणार नाही. भाजपकडून उद्या मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. गणेश नाईकही प्रचारात उतरणार आहेत,' अशी माहिती संदीप नाईक यांनी दिली होती. त्यात आता नवा ट्वीस्ट आला आहे.

दरम्यान, नवी मुंबईच्या बेलापूर मतदारसंघातून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नुकतेच भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आता गणेश नाईकांनी महापालिका नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बोलावली होती.

इतर बातम्या - PPF, सुकन्या, NSC योजनेमध्ये पैसे जमा करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी बातमी!

भाजपने विधानसभेसाठी पहिल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला. कार्यकर्ते आणि कुटुंबासह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक यांना तिकीट मिळण्याची शक्यता असताना दिल्लीतून जाहीर केलेल्या यादीत त्यांच्या जागी मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. बेलापूर मतदार संघातून आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

युतीच्या फॉर्मुल्यानुसार, नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यात आले आहेत. यानुसार ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली. गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांसह राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 उमेदवारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

इतर बातम्या - चंद्रकांत पाटलांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, कार्यकर्ते आक्रमक

गेली 20 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेत गणेश नाईक यांनी एकहाती सत्ता ठेवली होती. 2015च्या मनपा निवडणुकीत त्यांना धक्का बसला. काँग्रेसची मदत घेत त्यांना पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा लावावा लागला. 2014च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांचा पराभव केला होता. त्यावेळी त्या नवी मुंबईत किंग मेकर ठरल्या होत्या. खासदारकी, आमदारकी, महापौर आणि अशी अनेक पद घेऊन नवी मुंबईत उभ्या असलेल्या गणेश नाईक यांना 2014च्या लोकसभेत धक्का बसला.

गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांचा पराभव करत ठाण्यात राजन विचारे यांनी शिवसेनेचा झेंडा फडकावला. त्यानंतर झालेल्या विधानसभेत मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला. या दोन धक्कामुळे नवी मुंबईतील गणेश नाईकांच्या सत्तेला सुरुंग लागला अशा चर्चा होत्या.

इतर बातम्या - तिकीट न मिळाल्यामुळे भाजप नेत्याला अश्रू अनावर, भर सभेत ढसा-ढसा रडले

First published: October 2, 2019, 2:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading