मुंबई, 13 ऑगस्ट : कोरोनाची लाट (COVID-19) ओसरल्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे डेल्टा प्लसचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची (Delta Variant) संख्या आता 66 वर पोहोचली आहे. तर 66 रुग्णांपैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात आता डेल्टा प्लसची रुग्णसंख्या राज्यात 66 वर पोहोचली असून जळगावात सर्वाधिक 13 रुग्ण आहे. तर 19 ते 45 वयोगटात सर्वाधिक लागण झाली आहे.
महिला आणि पुरुष रुग्णाची संख्या जवळपास सारखी आहे. धक्कादायक म्हणजे, ज्यांनी दोन्ही डोस घेतले असे 10 रुग्ण आढळले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर उर्वरीत 31 जणांना कुठलेही लक्षण नाही.
पुणे तिथे वाद उणे, उदय सामंत येण्याआधीच रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराला स्थगिती!
विशेष म्हणजे, कोरोनाची लाट रोखण्यासाठी लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे. पण, डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये लशीचे दोन्ही डोस घेतलेले 10 जण आढळले आहे. लस घेतलेल्या 10 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.
तर दुसरीकडे, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आहे. आज राज्यात 5,861 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आज राज्यात 6,686 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 158 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 % एवढा आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ६३,००४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
काय आहे डेल्टा प्लस कोरोना?
डेल्टा प्लस हा डेल्टा किंवा ‘बी1.617.2’ याचंच रौद्र रुप आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा भारतातच आढळला होता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच जबाबदार होता. व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे कोरोना किती घातक होऊ शकतो, याचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही. भारतात नुकतंच मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला परवानगी मिळाली आहे. मात्र, ही पद्धतचही डेल्टा प्लसपुढे निष्प्रभ ठरत असल्याचं म्हटलं जात आहे.
पुन्हा एकदा चिक्की घोटाळ्यावरून आमनेसामने, धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा
दिल्लीतील सीएसआयआर- इन्स्टिट्युट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) शास्रज्ञ विनोद स्कारिया यांनी रविवारी याबद्दल ट्विट केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं,‘ हे म्युटेशन स्पाईक प्रोटीन SARS-CoV-2 मध्ये म्युटेशन झाल्यामुळे माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये तो प्रवेश करू शकतो. सध्या भारतात K417N ची व्हेरिएंट फ्रीक्वेन्सी फार नाही. हे सिक्वेन्सेस प्रामुख्याने युरोप, आशिया आणि अमेरिकामध्ये सापडले आहेत.’ या वर्षी मार्चमध्ये पहिला सिक्वेन्स युरोपमध्ये सापडला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.