क्रिकेटच्या मॅचवरून तुफान राडा! तिघांना दुखापत, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

क्रिकेटच्या मॅचवरून तुफान राडा! तिघांना दुखापत, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबईमध्ये क्रिकेटच्या मॅचवेळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. रविवारी कंळबोलीमध्ये हा प्रकार घडला आहे.

  • Share this:

पनवेल, 19 जानेवारी : नवी मुंबईमध्ये क्रिकेटच्या मॅचवेळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. रविवारी कंळबोलीमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये स्थानिक नगरसेवकाच्या टीमचा विजय झाला, पण यानंतर दोन टीममध्ये बाचाबाची झाली. यानंतर रात्री 10 च्या सुमारास विजय झालेल्या टीमच्या खेळाडूंच्या मेडिकल स्टोअरमध्ये पराभूत झालेले खेळाडू आहे. हे मेडिकल स्टोअर जिंकलेल्या टीमच्या तीन भावांचं आहे.

मेडिकल स्टोअरमध्येच या दोन्ही गटांमध्ये मारामारी झाली, तसंच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या तीनही भावांना हाणामारीमध्ये दुखापतही झाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात 307 (खुनाचा प्रयत्न) चा गुन्हा दाखल केला आहे. अजूनही पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.

Published by: Shreyas
First published: January 19, 2021, 12:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या