मुंबई 17 जून: महाराष्ट्रात कमी तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. रिश्चटर स्केलवर त्याची तीव्रता 2.5 एवढी नोंदविण्यात आली. मुंबई पासून 103 किमी उत्तरेला या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती नेशनल सेंटर ऑफ सेसिमोलॉजी National Center for Seismology या संस्थेने दिली आहे. हा भूकंप अतिशय कमी तीव्रतेचा असल्याने त्याची कंपनं फारशी जाणवली नाहीत. मात्र मुंबईपासून जवळच त्याचं केंद्र असल्यााने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या भूकंपामुळे कुठलीही जिवित अथवा वि हानी झाली नाही. देशातल्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
राजधानी दिल्लीत तर गेल्या दोन अडीच महिन्यांमध्ये 12 वेळा भूंपाचे धक्के जाणवले होते. तर महाराष्ट्रातल्या कोयनेच्या क्षेत्रात दरवर्षी अशा प्रकारचे कमी तीव्रतेचे धक्के जाणवत राहतात.
An earthquake of 2.5 magnitude was recorded 103 km north of Mumbai, Maharashtra at around 11:51 am: National Center for Seismology
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.